आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटना आक्रमक‎:उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदारांचे‎ कामबंद आंदोलन; 40 अधिकाऱ्यांचा सहभाग‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेड पे वाढवावी, या प्रमुख‎ मागणीसाठी साेमवारपासून महाराष्ट्र‎ राज्य तहसीलदार व नायब‎ तहसीलदार संघटनेकडून कामबंद‎ आंदाेलन पुकारले. आंदाेलनात‎ उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,‎ नायब तहसीलदार असे ४०‎ अधिकारी सहभागी झाले. मात्र‎ आंदोलन काळात नैसर्गिक आपत्ती‎ व कायदा, सुव्यवस्थेशीनिगडीत‎ कामे सुरू आहेत.‎ नायब तहसीलदार राजपत्रीत‎ वर्ग-२ हे महसूल विभागातील‎ महत्‍वाचे पद आहे. मात्र नायब‎ तहसीलदार या पदाचे वेतन‎ राजपत्रित वर्ग-२ चे नाही. त्यामुळे‎ महाराष्‍ट्र राज्‍य तहसीलदार, नायब‎ तहसीलदार संघटनेने ग्रेड पे‎ वाढवण्‍याबाबत १९९८ पासून‎ शासनाकडे पाठपुरावा केला.‎ संघटनेच्‍या मागणीचा शासनस्तरावर‎ विचार केलेला नाही. अखेर ३ एप्रिल‎ पासून कामबंद आंदोलन पुकारले.‎