आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील; सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे भुसावळ मंडळाचे अध्यक्ष वि. के. समादिया

मूर्तिजापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे कर्मचारी संघटित राहिल्यास त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची आणि त्यांच्या विविध पदांवर होणाऱ्या पदोन्नतीबाबत संघटनेच्या वतीने लढा देऊन त्यांचे हित जोपासणे व न्याय हक्काकरिता सेंटर रेल्वे मजूर संघटना वर्षानुवर्षांपासून कार्य करीत आहे. जपण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वसमावेशक सर्वांच्या कल्याणासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ सतत प्रयत्नशील असतो असे प्रतपिादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे भुसावळ मंडळाचे अध्यक्ष वि. के. समादिया यांनी केले.

मूर्तिजापूर येथील सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अपघातात मृत्यू झालेल्या रेल्वे कर्मचारी आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या शाखेचे सदस्य स्व. विवेक भौतकर यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात येऊन संघटनेतर्फे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत झोनल सचिव किशोर कोलते, भुसावळ मंडळाचे कोषाध्यक्ष एस. के. दुबे, विमा प्रतिनिधी किरण बडे, ए. जी. एस. आणि सचिव बी. आर. धाकडे, रेल्वे सुरक्षा बलाचे शशी जयस्वाल, अकोला येथील महिला अध्यक्षा मंगला मोरे, अकोला शाखा सचिव कविता गावंडे, सहाय्यक सचिव छाया मंडलिक, मूर्तीजापूर शाखेचे अध्यक्ष विवेक चव्हाण, सचिव मोहम्मद अलतमश यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी मूर्तीजापूर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे पदाधिकारी प्रशिक खोब्रागडे, नितीन क्यास्ते, बालकदास जामनिकर, आशीष फुलझेले, अतुल सूर्यवंशी, आशिष तायडे, संतोष मलन्ना, रोहन कांबळे, गौतम इंगळे, दामू लोखंडे, विजय इंगळे, विशाल नितोने, केशव कनसे, जगन्नाथ ढिवर, राजू डोंगरदिवे, सोनाली टाले आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...