आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:राज्यपालांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; शिवसेनेचे आंदाेलन

अकाेला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतून गुजराती, राजस्थानी लोकांना काढल्यास पैसाच शिल्लक राहणार नाहीत,’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याचे तीव्र पडसाद शनिवारी येथे उटमले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप करीत शिवसेनेने गांधी चाैकात आंदाेलन केले. शिवसैनिकांनी घाेषणा देत भाजपवर टीकास्त्र डागले.

महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना इथून काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही, असे राज्यपाल एका कार्यक्रमात म्हणाले हाेते. या वक्तव्यानंतर राज्यभरातून टीकेचा भडीमार हाेत आहे. दरम्यान, ३० जुलैला राज्यपालांच्या उपराेक्त विधानाविराेधात शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी गांधी चाैकात हातात निषेधाचा फलक व भगवा झेंडा घेत घाेषणा दिल्या. या आंदाेलनामुळे काही वेळ गांधी चाैकात वाहतुकीची काेंडी झाली हाेती. पाेलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आंदाेलनात अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, उपजिल्हाप्रमुख मंगेश काळे, पंकज जायले, अविनाश माेरे, गजानन बाेराळे, नितीन मिश्रा,अनिल परचुरे, रुपेश ढाेरे आदी सहभागी झाले हाेते.

आंदाेलनात या दिल्या घाेषणा ः शिवसैनिकांनी गांधी चाैकात हातात घेतलेल्या फलकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छायाचित्र हाेते. मराठी अस्मितेचा अपमान करणाऱ्या राज्यपाल यांना पदावरून हटवावे, असे नमूद करीत जाहीर िनषेध नाेंदवत घाेषणाही दिल्या.

शिंदे गटातील कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न ः शिवसैनिक आंदाेलनासाठी आले. त्यावेळी शिंदे गटात सहभागी माजी आमदार बाजाेरीयांचे वाहन तेथून गेले. त्याच वेळी शिंदे गटात सहभागी दाेन कार्यकर्ते दुचाकीरून गेले. या दुचाकीला शिवसैनिकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निघून गेले.

मुंबई महाराष्ट्रापासून ताेडण्याचा डाव
मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई महाराष्ट्रपासून ताेडण्याचे प्रयत्न हाेत आहे, असा आराेप शिवसेनेचे अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा यांनी केला. मुंबई, महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसचे सर्वाधिक याेगदान आहे. राज्यपाल हे मानाचे व घटनात्मक पद आहे. त्यांनी खुर्चीचा, त्या पदाचा मान ठेवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...