आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील 3 जलकुंभाचे उद्या स्ट्रक्चरल ऑडिट:मनपाकडून 5 लाखांचा भरणा; कामासाठी 3 जणांची टीम येणार

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील धोकादायक ठरलेल्या तीन जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडीट शुक्रवारी 2 डिसेंबर रोजी केले जाणार आहे. यासाठी महापालिकेने पाच लाख 42 हजार रुपयाचा भरणा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावतीकडे केला होता. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी महाविद्यालयाची तीन सदस्यीय समिती येणार आहे.

शहरात 1977 साली नवीन बसस्थानका मागील दोन आणि जुने शहरातील शिवनगर भागात जलकुंभ बांधण्यात आले होते. 2006 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजना महापालिकेने स्वत:च्या ताब्यात घेतली. हस्तांतरणाच्या वेळी मजिप्राने हे तीन जलकुंभ क्षतीग्रस्त झाल्याची माहिती दिली होती. मात्र महापालिकेने या जलकुंभाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता हे जलकुंभ धोकादायक ठरले आहे.

जलकुंभाची पाहणी करुन 27 ऑगस्ट रोजी ‘शहरातील 3 जलकुंभ धोकादायक स्थितीत, 45 वर्षात एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट नाही’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करुन या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या वृत्ताची दखल थेट उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांनी घेतली. त्यांनी थेट महापालिका प्रशासनाला वृत्त पाठवुन याबाबतचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले होते. या नंतर खडबडुन जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने एक प्रकारे जलकुंभ क्षतीग्रस्त असल्याची कबुली देतानाच या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय अमरावती येथून करुन घेण्यात येईल. स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवाला नुसार यावर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती शासनाला पाठवण्यात आली.

या अनुषंगाने महापालिका पाणी पुरवठा विभागाने शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय अमरावती यांना पत्र पाठवुन शहरातील तीन जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची विनंती केली होती. यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अपलाईल्ड मॅकेनिक्स (उपयोजिता यंत्र शास्त्र विभाग) चे असोसिएट प्रोफेसर बी.एस.लांडे त्यांच्यासह तीन जणांच्या सदस्यांसह स्ट्रक्चरल ऑडीटसाठी येत आहे. सकाळी 11.00 वाजता नवीन बसस्थानकामागील दोन जलकुंभाचे आणि त्या नंतर शिवनगर मधील एका जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्या नंतर महापालिकेच्या वतीने तशी कार्यवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...