आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगौरव:वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा

बार्शीटाकळी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानायक वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बार्शीटाकळी शहरात प्रभू-पार्वती मंगल कार्यालयात सत्कार समारंभ व तालुक्यातील विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बंजारा समाज पोहरा देवी संस्थानचे प्रमुख सद्गुरू जितेंद्र महाराज यांची यावेळी उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य गोर बंजारा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष हिरासिंग राठोड अध्यक्षस्थानी होते.

प्रारंभी बंजारा समाजाच्या महिला व पुरुषांनी परंपरागत वेशभूषा धारण करून डोक्यावर कळस घेऊन पिंपळखुटा रोड ते मंगल कार्यालयापर्यंत मिरवणूक काढली. यावेळी मंचावर अध्यक्ष हिरासिंग राठोड, प्रा. मधुकर पवार, मनोहर राठोड, गोबंस जिल्हाध्यक्ष रतन आडे, महादेव जाधव, माजी पं. स. सभापती अशोक राठोड, न. पं.चे नगरसेवक अॅड. विनोद राठोड, पं. स. बार्शीटाकळी उपाध्यक्ष संगीता जाधव, रामसिंग जाधव, पप्पू जाधव, रवी राठोड मंचावर विराजमान होते. संत सेवालाल महाराज आणि कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी हारार्पण केले. यानंतर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील विविध गावातील ९६ टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप राठोड यांनी केले. या वेळी वसंतराव जाधव, अरविंद जाधव, मनोज जाधव, नारायण पवार, संदीप राठोड, केवल राठोड, राजाराम राठोड, दमदुसिंग चव्हाण, शंकर चव्हाण, शालिग्राम चव्हाण, विनोद जाधव, मनोहर राठोड, गोटू महाराज व बंजारा समाजातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...