आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल:सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोलाद्वारा आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन २६ ते २९ जुलै कालावधीत लालबहादूर शास्त्री स्टेडियम अकोला येथे करण्यात आले. स्पर्धेचे अंतिम सामने शुक्रवारी खेळण्यात आले. कोरोनानंतर प्रथमच अकोल्यामध्ये मैदानी स्पर्धांना सुरुवात झाली.

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा २०२२ मध्ये विविध गटात शाळांनी विजेतेपद पटकावले. १७ वर्षे मुले ग्रामीणमध्ये प्रथम क्रमांक अल मेहमूद इंटरनॅशनल स्कूल, पाचमोरी, द्वितीय क्रमांक श्रीसमर्थ पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रिधोरा, तर तृतीय क्रमांक- साने गुरुजी विद्यालय खडकी यांनी पटकावला. १७ वर्षे मुली ग्रामीण प्रथम क्रमांक श्री समर्थ पब्लिक स्कूल कनिष्ठ महाविद्यालय रिधोरा, द्वितीय क्रमांक अल मेहमूद इंटरनॅशनल स्कूल पाचमोरी, तर १७ वर्षे मुली मनपा क्षेत्र प्रथम क्रमांक पोदार इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय क्रमांक नोवेल स्टेट बोर्ड स्कूल, १७ वर्षे मुले मनपा क्षेत्र प्रथम क्रमांक उस्माना आजाद हायस्कूल, द्वितीय क्रमांक अँग्लो उर्दू हायस्कूल यांनी प्राप्त केला.

१४ वर्षे मुले मनपा क्षेत्र प्रथम क्रमांक उस्माना आझाद हायस्कूल, द्वितीय क्रमांक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, तृतीय क्रमांक सुफ्फा इंग्लिश स्कूल, १४ वर्षे मुले ग्रामीण प्रथम क्रमांक अल मेहमूद इंटरनॅशनल पांचमोरी, द्वितीय क्रमांक श्रीसमर्थ पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रिधोरा, तृतीय क्रमांक साने गुरुजी विद्यालय खडकी यांनी प्राप्त केला. स्पर्धांमध्ये पंच म्हणून सईद खान, नईम खान, फईम खान, उमेश पिल्ले, सलीम खान, अब्दुल अजीज, अंजार कुरेशी, निशांत वानखडे, रहीम खान यांनी कार्य केले असून, स्पर्धा समन्वयक म्हणून लक्ष्मी शंकर यादव यांनी कार्य केले आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...