आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी भाषा समृद्ध असून साहित्य, लोकसंस्कृती आणि विविध बोलींनी मराठीची व्याप्ती बृहद झाली आहे. मराठी भाषा आणि लोप पावत असलेल्या मराठी लोकसंस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या हेतुने प्रभात किड्स स्कूलच्या मराठी विभागाद्वारे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. या पंधरवड्यात विविध उद्बोधन वर्ग, कार्यशाळा, शब्द-व्याकरण प्रदर्शन, नाट्य, पोवाडा, भारूड, कविता सादरीकरण, गायन आणि नृत्यातून मराठी भाषेची समृद्धी विद्यार्थ्यांनी अनुभवली.
या मराठी भाषा पंधरवड्याची सांगता पुरस्कार वितरण सोहळ्याने झाली. मराठीभाषा पंधरवडा कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा गझल नवाज भिमराव पांचाळे यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे होते तर संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ, प्रा. डॉ. सुहास उगले, डॉ. विनय दांदळे प्रामुख्याने उपस्थित होते. ''माय मराठी भरजरी, असा हा उत्सव जरतारी'' मराठी भाषा पंधरवड्याअंतर्गत सोहळ्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलनाने झाली. तसेच यावेळी वाड़मयपेटीचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमात मराठी विभागाच्या तब्बल २३० विद्यार्थ्यांनी नाट्य, लोकनाट्य, कविता सादरीकरण, गायन, समाजप्रबोधनात्मक भारुड आणि नृत्यातून मराठी भाषेची समृद्धी व्यक्त केली. तत्पूर्वी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगावर पोवाडा अभिनयासह सादर करण्यात आला.
भजन, अभंग, भारूड, कीर्तन, लावणी, पोवाडा, गवळण, लोकगीत, लोकनृत्य, कविता, नाटक, प्रबोधन सादर करून मराठी भाषेतील विविध कला अविष्कार सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागाचे शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागप्रमुख चंद्रकांत पोरे, उप-विभागप्रमुख अनुराधा माहोरे, आनंद जोशी, अरुणा वाघमारे, कविता कोल्हाळे, कविता विखे, वर्षा दांडगे, रोहित हिवरकर, दीपाली पोरे, संतोष गायगोले, कला विभागाचे प्रमुख दिनेश पाटील, विजय वाहोकार, नृत्य विभागाच्या श्रुती गोरे यांच्यासह ‘प्रभात’च्या शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
भाषा प्रदर्शनातून विविध मान्यवरांनी केले मार्गदर्शन ः मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यासाठी कविवर्य किशोर बळी यांची मुलाखत घेण्यात आली. कविवर्य किशोर बळी यांनी विद्यार्थ्यांना कविता लेखनाबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळी किशोर बळी लिखित ''गुरु आयोनी लडका'' या कादंबरीसाठी प्रभात किड्स स्कूल चे संस्थापक अध्यक्ष डॉ गजानन नारे यांच्या हस्ते किशोर बळी यांचा हृद्य सत्कार केला. तसेच ''आदर्श वाचन पद्धती'' या विषयावर ज्येष्ठ लेखिका आणि आकाशवाणी निवेदिका सीमा शेटे-रोठे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस मराठी भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. सुहास उगले यांनी मार्गदर्शन केलेस अशी माहिती कळवण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.