आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Students Go For Teaching In The Sun At Telhara; Parents Worry, Chimpanzees Have To Travel Two To Three Kilometers In The Scorching Sun | Marathi News

उन्हाचे चटके:तेल्हारा येथे उन्हात शिकवणीसाठी जातात विद्यार्थी; पालकांना चिंता, चिमुकल्यांना कडक उन्हामध्ये दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागतो

तेल्हारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विद्यार्थ्यांचे शिकवणी भर उन्हात सुटत असल्याने चिमुकल्यांना कडक उन्हामध्ये दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. दुपारच्या कडक उन्हात शिकवणी वर्गाची सुट्टी होत असल्याने विद्यार्थ्यांना उन्हाच्या तीव्र झळा सोसणे भाग पडत आहे. सद्यःस्थितीत परिसरात सतत तापमानात वाढ होत असून, दररोज ४० अंश सेल्सिअसच्या वरच तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते दुपारी १२ वाजतापासून निर्मनुष्य होत आहेत.अशातच निर्मनुष्य रस्त्यांवर रखरखत्या उन्हात विद्यार्थीच रस्त्यावर दिसत आहेत. याबाबत पालक चिंता व्यक्त करत आहे. त्यामुळे शिकवणी संचालक आणि पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच प्रशासनाने याकडे लक्ष देवून उपाय याेजावे, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.

योग्य खबरदारीचे आवाहन
तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना वाढत्या तापमानाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लवकरच सूचना दिल्या जातील.
लिंबाजी बारगिरे, सहायक गटविकास अधिकारी, पंचायत समिती तेल्हारा

वेळा बदलवण्याचे आदेश देणार
शहरातील सर्व खासगी शिकवणी वर्ग संचालकांना शिकवणी वर्गाच्या वेळेत बदल करून सकाळ किंवा सायंकाळ याच वेळेत शिकवणी वर्ग भरवण्याचे निर्देश देण्यात येईल.
डॉ. संतोष येवलीकर तहसीलदार, तेल्हारा.

बातम्या आणखी आहेत...