आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभगवद्गीतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रगल्भ करावे असा संदेश माॅ शारदा ज्ञानपीठ शाळेचे उपाध्यक्ष डॉ. सत्यनारायण बाहेती यांनी गीता जयंती व भगवद्गीतेचे महत्त्व विशद करताना दिला. श्रीराम कृष्ण विवेकानंद सेवा मंडळ द्वारा संचालित गीता नगर स्थित माॅ शारदा ज्ञानपीठ येथे गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
्रमुख अतिथी म्हणून निर्माण सहकारी बँकेचे अध्यक्ष गणेश देशमुख होते. तसेच संचालिका विद्याताई उमाळे व उषाताई देशमुख, संगीत शिक्षक अजय देवपुजे, मुख्याध्यापक प्रशांत खत्री, व्यवस्थापक राहुल देशमुख आदी उपस्थित होते. गीता जीवन बदलण्याचे शिक्षण देते. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याकडे पाहण्याची भूमिका नेहमी सकारात्मक ठेवावी. भारतीय संस्कृतीमध्ये गीतेला मातेचा दर्जा आहे. गीता हा एक असा शाश्वत ग्रंथ आहे की, जो विद्यार्थ्यांना जिज्ञासा, नम्रता, सेवा जोपासण्यास मदत करते, असे प्रमुख पाहुणे गणेश देशमुख यांनी सांगितले. तसेच गीतेचा प्रत्येक शब्द जगण्याची प्रेरणा देतो. गीता हा ग्रंथ फक्त पूजेसाठी नसून तो आचरणात आणावा असे मार्गदर्शन त्यांनी केले. मुख्याध्यापक प्रशांत खत्री यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता सरनाईक यांनी तर आभार प्रदर्शन नेहा कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सावित्री विश्वकर्मा, कल्पना पोहरे, पद्मिनी शिंदे, सीमा पारतवार, प्रीती शिंदे, स्वाती गावंडे, निकिता दुधे, किरण तायडे, शिवानी बैस, सुषमा दाभाडे, प्रतिभा दुधे, मंजुषा शर्मा, संतोषी शर्मा, पुनम गावंडे यांनी केले. करुणा बागडे, अश्विनी सरोदे, रेणुका दुधे, मुकेश अस्वारे यांनी सहकार्य केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भगवद गीता ग्रंथ व श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रिया वाघमारे, गौरी खोडके, वैष्णवी वहिले, अंशुल होरे आणि साची बेतवार या विद्यार्थ्यांनी गीतेमधील बाराव्या अध्यायाचे पठण केले. तसेच इयत्ता सहावीचा विद्यार्थी धीरज गाडगे हा कृष्ण तर इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सार्थक तायडे यांनी अर्जुनाची वेशभूषा साकारून युद्धभूमीवर कृष्णाने अर्जुनाला जे ज्ञान सांगितले, गीतेतून कृष्णाने अर्जुनाला जे मार्गदर्शन केले, त्यावर आधारित श्रीकृष्ण आणि अर्जुन ही नाटिका सादर केली. इयत्ता सहावीचा विद्यार्थी प्रतीक जाधव याने गीताजयंतीनिमित्त संस्कृतमध्ये भाषण दिले. इयत्ता सातवीमधून नयना मेहंगे, क्रांती इंगळे या विद्यार्थिनींनीसुद्धा भाषणे दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.