आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:हेल्मेट न घालणाऱ्या 41 दुचाकी चालकांवर‎ उप प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई‎

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उप प्रादेशिक परिवहन‎ विभाग हेल्मेट सक्ती मोहीम राबवत‎ आहे. शनिवारी हेल्मेट न‎ घालणाऱ्या ४१ दुचाकी‎ चालवणाऱ्यावर कारवाई केली.‎ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी‎ जयश्री दुतोंडे यांच्या आदेशानुसार‎ जिल्हा न्यायालयासमोर रेल्वे‎ स्टेशन रोड येथे हेल्मेट तपासणी‎ मोहीम राबवण्यात आली.

या‎ मोहीमे अंतर्गत ६५ वाहने तपासून‎ दोषी आढळलेल्या ४१ वाहन‎ चालक, मालकावर मोटर वाहन‎ अधिनियम अंतर्गत कारवाई‎ करण्यात आली व हेल्मेट‎ घालण्याबद्दल व रोड सेफ्टीच्या‎ अनुषंगाने लोकांचे समुपदेशन‎ करण्यात आले.‎ या कारवाईमध्ये मोटार वाहन‎ निरीक्षक संदीप तुरकने, सहायक‎ मोटार वाहन निरीक्षक दिनेश एकडे,‎ कृष्णा नेवरे, गोपाल पांचोली व‎ वाहन चालक संदीप काळे यांचा‎ समावेश होता‎.

बातम्या आणखी आहेत...