आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासभापतींना कार्यभार देण्याबाबत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिम यांनी ८ जानेवारी रोजी जि.प.अध्यक्षांना पत्र पाठवले होते. त्यानंतर ग्राम विकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी २२ फेब्रुवारी रोजी बांधकाम व शिक्षण या दोन विषय समित्यांचा कार्यभार सम्राट डोंगरदिवे यांना सोपविण्यात यावा, असे निर्देश दिले. आता गुरुवारी होणाऱ्या सभेच्या विषय सूचीवर तरी हा विषय नसून, वेळेवर येणाऱ्या विषयांमध्ये हा धोरणात्मक विषय मांडता येणार नाही. एकूणच या कार्यभाराच्या मुद्यावर २१ जून रोजी होणाऱ्या सभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे.
जि. प. सभापतींना बांधकाम व शिक्षण या दोन विषय समित्यांचा कार्यभार सोपवण्याचा विषय २१ जून हेणाऱ्या सर्व साधारण सभेच्या विषय सूचीवर घेतला. मात्र प्रकरण न्यायप्रविष्टचा मुद्दा वंचित आघाडीकडून उपस्थित होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात कार्यकाळ संपणार असल्याने सभापतीसह मविआ सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर कसा पलटवार करतात हे पाहणे औत्सुक्याचे राहील. ओबीसी आरक्षणाने जि.प.च्या रिक्त दोन सभापतिपदांच्या निवडणुकीत वंचितचा पराभव करीत मविआने २९ ऑक्टोबरला बाजी मारली होती. महिला बाल कल्याण सभापतीपदाच्या निवडणुकीत स्फूर्ती गावंडे, विषय समिती सभपतीपदासाठी सम्राट डोंगरदिवे यांची अविरोध निवड झाली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया झालेल्या विशेष सभेला वंचितला पाठिंबा दिलेल्या सदस्या नीता गवई यांनी विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले. याच प्रकरणी सभापती डोंगरदिवे यांनी पदभार सोपवण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. रिक्त शिक्षण व अर्थ समितीचा प्रभार उपाध्यक्षा सावित्री राठोड यांच्याकडे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.