आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा क्रीडा परिषद:नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धेत श्री साई विद्यालय व एसओएसचे यश

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चे १५ वर्षाआतील मुलांच्या संघाचे सामने १६ व १७ आॅगस्टला पार पडले.स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री साई विद्यालय, लोहारा जि. यवतमाळ, द्वितीय क्रमांक सहकार विद्यामंदिर विद्यालय, बुलडाणा, तर तृतीय क्रमांक स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणा रोड या संघाने पटकावला. या स्पर्धेचे पंच म्हणून अजय कांबळे, मयूर निंबाळकर, स्वप्निल अंभोरे, मयूर चौधरी, परेश घाटोळ, गौरव दांदळे, आशिष उगवेकर, तौफिक शेख, ऋषिकेश श्रीवास, ओम टाकसाळकर, आशिष अढाऊ, साहिल कंदारकर, धीरज चव्हाण यांनी काम पाहिले. राज्यस्तरीय नेहरू कप स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडू, संघास जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...