आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरण:वातावरणात अचानक बदल; किमान तापमानात तीन अंशांनी झाली घट

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली होती. मात्र बुधवारी मध्यरात्रीनंतर अचानक वातावरणात बदल होऊन गार वारे वाहण्यास सुरुवात झाली. गुरुवारी, ८ डिसेंबरला किमान तापमानाचा पारा तीन अंशाने घसरून १५ अंशावर आला.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून वातावरणात अचानक बदल जाणवला. दिवसभर वातावरणात गारवा होता. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने स्पष्ट सूर्यप्रकाशही नव्हता. काही दिवसांपूर्वी किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडी गायब झाली होती. ५ डिसेंबरला किमान तापमानाची १८.५ एवढी नोंद झाली होती. दोन दिवसानंतर किमान तापमान १५ अंशावर आले आहे. उत्तरेकडील राज्यात किमान तापमानात चढउतार होत आहे.

त्याचा परिणामही जिल्ह्यात दिसून आला. हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार तामिळनाडू किमान‎ तापमानात तीन अंशाने झाली घट‎ किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून वातावरणात‎ बदल दिसत आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरातील ठळक कमी‎ दाबाचे क्षेत्र आता तीव्र वादळाच्या रूपात ईशान्य बंगालच्या‎ उपसागरात आहे. याचे चक्रीवादळाच्या स्वरूपात‎ तामिळनाडू-दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर पोहोचण्याची‎ शक्यता होती. त्यानुसार विदर्भात ढगाळ वातावरण, तर पूर्व‎ विदर्भात पावसाची शक्यता असल्याचे अभ्यासक सांगतात.‎

बातम्या आणखी आहेत...