आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या:निवडणुकीसाठी पैशांची मागणी व शारीरिक छळ

बाळापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेने केलेल्या आत्महत्या केल्याप्रकरणी उरळ पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उरळ पोलिसांनी पतीला अटक केली. जयश्री नागे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सासरा वसंत नागे, जेठ नितीन नागे, सासू शोभा नागे आणि नणंद जयश्री सुभाष खराटे आणि वेदांती अनिल पातोंड असे सासरच्यांची नावे असून पोलिसांनी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

असे आहे प्रकरण

विवाहितेने 23 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. 26 ऑगस्ट रोजी प्रकरणात गुन्हा दाखल झाला. यात 27 ऑगस्टला पती आशिष नागे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नंदा रामदास साबळे रा. मांजरी, यांनी उरळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार बाळापूर तालुक्यातील मांजरी येथील रामदास साबळे यांची मुलगी जयश्री हिचा विवाह रितीरिवाजानुसार 26 एप्रिल रोजी अकोला तालुक्यातील पैलपाडा येथील वसंतराव नागे यांचा मुलगा आशिष याच्याशी झाला होता.

ती सासरी नांदत असताना पती, सासू-सासरे, ननंद, जेठ यांच्याकडून तिला सातत्याने शिवीगाळ, मारहाण केली जात होती. तिला सतत टोचून बोलून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. व निवडणूकीसाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तीला तगादा लावत होते.

मुलगी झाली म्हणून छळ

दरम्यान दाम्पत्याला कन्यारत्न झाले. मुलगी झाली म्हणून तिचा छळ पुन्हा वाढला. त्यानंतर ती माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतरही तिचा पती आशिष याने तीला फोनवरून पैशाची मागणी केली होती. याला कंटाळून जयश्रीने आपल्या माहेरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी उरळ पोलिस ठाण्यात तिच्या सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...