आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा रविवारी होणार आहे. ७ हजार ६२२ विद्यार्थ्यांसाठी २९ केंद्रांवर परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत ही परीक्षा होणार असून, परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ अन्वये रविवार, ३ एप्रिल रोजी सकाळी सहा ते सायंकाळी आठ यावेळात सर्व २९ परीक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
असे आहेत परीक्षा केंद्र : अकोल्यातील २९ केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा होणार आहे. यात प्रभात किड्स (वाशीम रोड), जागृती विद्यालय व उच्च माध्यमिक. विद्यालय, शिवाजी आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, खंडेलवाल ज्ञानमंदीर कॉन्व्हेंट, सिताबाई कला महाविद्यालय, एल. आर. टी. कॉलेज, शिवाजी हायस्कुल, दी नोएल इंग्लिश हायस्कूल, उस्मान आझाद ऊर्दू हायस्कूल, भारत विद्यालय, एस. आर. पाटील कॉलेज, स्व. ज्योती जानोळकर विद्यालय, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, जी. एस. कॉन्व्हेंट, होलीक्रॉस कॉन्व्हेंट, गुरुनानक विद्यालय श्री. शिवाजी विद्यालय ज्युबिली इंग्लिश हायस्कूल/ज्युनिअर कॉलेज, न्यू इंग्लिश हायस्कूल, मांगीलाल शर्मा विद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, डीएव्ही कॉन्व्हेंट स्कूल, अकोला आर्टस, कॉमर्स, सायन्स कॉलेज, कोठारी कॉन्व्हेंट आदर्श विद्यालय, खंडेलवाल इंग्लीश स्कूल, सुधाकरराव नाईक महाविद्यालय आणि बी. आर. हायस्कूलचा समावेश आहे.
केंद्रात कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेण्यात येणार
पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रीतरित्या प्रवेश करणे, परीक्षा केंद्र परिसरात घोषणा देणे, यास मनाई करण्यात आली आहे.
केंद्रावर प्रवेश करणाऱ्या परीक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थर्मामिटरद्वारे तापमान तपासण्यात येणार आहे.
सर्व पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करणे अनिवार्य आहे.
हवा खेळती राहण्याचे दृष्टीने सर्व खिडक्या तसेच दरवाजे उघडे ठेवण्यात येणार आहेत.
सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे
परीक्षार्थींना ओळख असल्याशिवाय व मास्क लावल्याशिवाय प्रवेश देण्यात मिळणार नाही.
प्रत्येक परीक्षार्थी मध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहिल, अशी अशी बैठक व्यवस्था करण्यात यावी.
परीक्षा केंद्राच्या परिसराचे सोडियम हायपोक्लोराईटच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
कोणत्याही परिक्षार्थी, कर्मचाऱ्यास कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास रुग्णालयात भरती करण्यात येणार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.