आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी पत्रकार दिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघातर्फे शुक्रवारी ६ जानेवारीला जि.प. कर्मचारी भवनात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सहकार्याने आयोजित शिबिराला पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराच्या प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक महेंद्र कविश्वर व इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते पहिले मराठी वृत्त पत्रकार व दपर्णकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले.
वैद्यकीय चमूंचे स्वागत महेंद्र कविश्वर यांनी तर डॉ. तरंगतुषार वारे यांचे स्वागत पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेश शेगाेकार यांनी केले. डॉ. अदिती पिंपळे यांनी तंबाखुच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका आणि त्यापासून बचावासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विशालराजे बोरे यांनी केले.
या केल्या तपासण्या ः जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पत्रकारांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात रक्तदाब, मधुमेह, दंत तपासणी, मुखकर्करोग, नेत्र तपासणी केली. शिबिरात डॉ. राम बिहाडे, डॉ. अदिती पिंपळे, डॉ. ए.आर. रहमान, डॉ. आर.ए. सैय्यद, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समुपदेशक धम्मसेन शिरसाट, जे.बी. अवघड, सोपान अंधारे, राधिका जाधव यांचे सहकार्य लाभले. संतुलित आहार घ्या ः डॉ. तरंगतुषार वारे यांनी पत्रकारांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. धकाधकीच्या जीवनामुळे प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव वाढला आहे. ही स्थिती आजारांना निमंत्रण देणारी ठरत आहे. यापासून दूर राहण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम करा. तणावमुक्त जीवन जगण्याचा सल्ला डॉ. वारे यांनी दिला. अाैषधाेपचारासाठी सहकार्य करणार असल्याचे अाश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.