आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर भारताच्या ऑलिम्पिक विजेत्या व इतर खेळाडूंच्या लैंगिक शोषणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अकाेल्यातून दिवसेंदिवस समर्थन वाढतच असून, आता या खेळाडूंसाठी आणि महिला अत्याचाराविरेाधात नारीशक्तिने एल्गार पुकारला.
रखरखत्या उन्हात महिलांनी एकत्र येत ‘आखिर कब तक’ या मोहिमअंतर्गत शुक्रवारी स्वाक्षरी माेिहम राबविली. काळे कपडे परिधान करीत व हातात काळे झेंडे घेत महिलांनी अांदाेलनाचा बिगुल वाजवला.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंहवर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. मात्र ठाेस कार्यवाही हाेत नसल्याने लैगिक शोषणाचा गंभीर आरोप करणाऱ्या कुस्तीगीरांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे गत काही दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले.
परिणामी गुन्हा दाखल करण्यासह पुढील कार्यवाहीची मागणी कुस्तीपटूंनी केली. मात्र कार्यवाही झाली नाही. त्यानंतर हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात पाेहाेचले. सर्वाेच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिल्ली पाेिलसांनी एफआयआर नाेंदवला हाेता. दरम्यान आता अकाेल्यातील महिलाही अत्याचारग्रस्त खेळाडूंसाठी एकवटल्या आहेत.
फलक धरून केला निषेध
महिला-युवतींनी हातात फलक घेऊन आपला निषेध नाेंदवत खेळाडूंना पाठिंबा दिला. यात ‘बृजभूषणाला अटक झालीच पाहिजे’,‘बृजभूषण शेम-शेम’, ‘बृजभूषणची नार्काेटेस्ट करा’‘आराेपी बृजभूणणची पदावरून हकालपट्टी करा,’ ‘आम्ही पदे यासाठी जिंजकली हाेती काय न्याय द्या-न्याय द्या’,लेक वाचवा, लेक बढावा लेक घडवा’,‘ आखिर कब तक अन्याय’ यांचा समावेश हाेता.
आखिर कब तब?
नारीशक्ति अकाेलातर्फे सिव्हील लाईन्स चाैकात महिला-तरुणी एकवटल्या. ‘आखिर कब तक...?’, असा माेठा काळ्या रंगाचा फलकलावून दिल्लीतील निर्भयाप्रकरण, हैद्राबाद,उन्नाव, हाथरस, कठुआ आणि आता अकाेलाही...? असा भितीदायक तेव्हढाच संतापजनक प्रश्न विचारण्यात आला.
माेठ्या फलकावर स्वाक्षरी
स्वाक्षरीसाठी माेठा फ्लेक्सच लावण्यात आला आहे. महिला, पुरुष, युवक-युवती स्वाक्षरी करून खेळाडूंना आपले समर्थन व्यक्त करीत महिला अत्याचार राेखण्याची आणि दाेषींवर कठाेर कार्यवाहीची मागणी करीत हाेते. देश का मुखीया अंधा है, बृजभूषण हा धंदा है, यासह अन्य बाबी नमूद केल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.