आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य सोहळा:राज्यस्तरीय महिला मराठी साहित्य संमेलनातील सूर; गझल मुशायरा, कवी संमेलन रंगले

अकोला7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्त्रियांचे आत्मभान आणि अनुभव साहित्यातून पेरले जावे

स्त्रियांचे आत्मभान आणि अनुभव साहित्यातून पेरले जावे साहित्य सोहळा राज्यस्तरीय महिला मराठी साहित्य संमेलनातील सूर; गझल मुशायरा, कवी संमेलन रंगले

अकोला

परदेशी आक्रमणांमुळे स्त्रिया काही युगे मागे पडल्या. प्रचलित माध्यमांद्वारे त्यांचे साहित्य समाजापुढे आले नाही. ओव्या, लोकगीतांपर्यत मर्यादित राहिले. ब्रिटिश काळात फुले, डॉ. आंबेडकरांसारख्या व्यक्तींनी तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यामुळे अनेक स्त्रिया घडल्या. व्यक्त होऊ लागल्या. संत मीराबाई, बहिणाबाई यांच्या युगापासून तर आजपर्यंत अनेक लेखिकांनी आपल्या साहित्याचा ठसा उमटवला. पण अजूनही स्त्रियांचे आत्मभान आणि अनुभव साहित्यातून पेरले जाण्याची गरज आहे,’ असे मत साहित्यिक डॉ. स्मिता दातार यांनी व्यक्त केले. महिला साहित्य संमेलनात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

आजच्या युगातील स्त्रिच्या हातात पाळण्याच्या दोरीसह संगणकाचा माऊसही आहे. ज्याचा उपयोग करून तिने स्त्रीत्वाच्या कक्षा रूंदवाव्या. ती आई आहे. भविष्यातील वाचक पिढी घडवण्याची जबाबदारी तिच्यावर आहे.बुरसटलेले विचार सोडून तार्किक विचार करायला शिका. स्त्री-पुरूष रथाची दोन चाके आहेत. महिलांना त्यांचे हक्क प्राप्त झाले नाही, तर त्या बंडखोर होतात. स्त्री-पुरूष दोघांनी एकमेकांना सोबत घेऊन जीवन जगल्यास बंडखोरी होणार नाही. वैचारिक समानता प्राप्त होईपर्यंत बंडखोर लिखाणं आवश्यक आहे. यातूनच एक दिवस महिलांना संमेलनांच्या व्यासपीठावरही समान स्थान मिळेल व वेगळे महिला साहित्य संमेलन घेण्याची गरज पडणार नाही, अशी आशा या वेळी डॉ. दातार यांनी व्यक्त केली.

संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमाला अकोल्यातील साहित्यक्षेत्रातील बरीच मंडळी उपस्थित होती. या वेळी शब्दसृष्टीसंमेलन विशेषांक, मंगला नागरे यांच्या मंगलम् कवितासंग्रह व संगिता ताथोड यांच्या रक्तवाहिनी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डिंपल मापारी, प्रास्ताविक सृष्टी इंगळे, पाहुण्याचा परिचय संतोष इंगळे व आभार प्रदर्शन प्रा. वर्षा कावरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...