आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेच्या प्रवक्त्यात सुषभा अंधारे या संतभूमीत राहून संतांचा अपमान करीत असून, अपशब्द वापरत असल्याचा आराेप विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांनी केली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे.
ज्या पक्षांमध्ये सुषमा अंधारे राहितील त्या पक्षाला मतदान करणार नाही, अशी शपथ विश्व वारकरी सेनेतर्फे गंगासागर येथे गंगेच्या पात्रात वारकऱ्यांनी एकत्रितपणे घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करण्यात येत असून, त्याचे पडसादही उमटत आहेत. दरम्यान संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या हिंदू धर्मातील देव, देवी संत, महंतांच्या बद्दल पातळी सोडून बोलण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असे विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप गणेश महाराज यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायात फार संतापाची लाट उसळली आहे.
वारकऱ्यांनी घेतली शपथ
मुळात नास्तिक असणाऱ्या सुषमा अंधारे यांना उद्धवराव ठाकरे यांनी आपल्या पक्षात स्थान दिलेले आहे. आज हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी अंधारेंना कधीही आपल्या पक्षांमध्ये स्थान दिले नसते. विश्व वारकरी सेनेच्यावतीने गंगासागर येथे गंगेच्या पात्रात वारकऱ्यांनी एकत्र येऊन शपथ घेतली की, ज्या पक्षांमध्ये सुषमा अंधारे राहील आम्ही त्या पक्षाला मतदान करणार नाही’. त्यांना पक्षातून ताबडतोब काढून टाकण्यात यावे; अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी ज्ञानेश्वरी ग्रंथावर हात ठेवून शपथ घेतील की, यापुढे आम्ही ज्या राजकीय पक्षात सुषमा अंधारे आहे त्या पक्षाला मतदान करणार नाही, असा इशारा गणेश महाराज शेटे यांनी पत्रातून दिला आहे.
शिवसेनेच्या सुषभा अंधारे या संतभूमीत राहून संतांचा अपमान व अपशब्द वापरत आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. सुषमा अंधारे असणाऱ्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही, अशी शपथ ज्ञानाेबा-तुकाेबांना मानणारे आम्ही वारकरी गंगासागर या पवित्र भूमीत शपथ घेतली.
- गणेश महाराज शेटे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.