आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शहरात सामूहिक विवाह सोहळ्यात अल्पवयीन मुलींच्या लग्नाचा संशय ; जिल्ह्यात सात दीवसात चार बाल विवाह रोखले; जिल्हा बालसंरक्षण कक्षाची कारवाई

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील कुंभारी रस्त्यावर सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात तब्बल ३५ जोडप्यांचा विवाह होणार होते. मात्र, या सामूहिक सोहळ्यात काही अल्पवयीन मुलींचे लग्न होणार असल्याची माहिती पोलिस आणि महिला व बालकल्याण समितीला प्राप्त झाली. या सामूहिक विवाह सोहळ्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बालकल्याण समितीचे अधिकारी सोबतच चाइल्ड लाइनच्या कर्मचाऱ्यांनी या सामूहिक विवाहस्थळी भेट दिली आणि येथील विवाह होणाऱ्या मुलींचे आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी सुरू केली.

यामध्ये कित्येक मुली अशिक्षित असल्याने त्यांच्याकडे कुठलाच कागदी पुरावा नाही, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. जवळपास १३ मुलींची कागदपत्रे पोलिसांनी तपासल्याची माहिती आहे. यातील काही जोडप्यांचा विवाह हा सायंकाळी सातच्या अगोदर झाला. अन् उर्वरित जोडप्यांचे विवाह सातच्या नंतर होणार होते. त्यामुळे या मुलींचे कागदपत्र अधिकारी तपासू शकले नाही.

दरम्यान या संदर्भात सूत्रांच्या माहितीनुसार या सर्व मुलींचा विवाह होईपर्यंत महिला व बालकल्याण समितीचे अधिकारी आणि पोलिस रात्री उशिरापर्यत तिथे ठाण मांडून होते.

बातम्या आणखी आहेत...