आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:केंद्र शासनातर्फे जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षा अभियान

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळ पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी केंद्र शासनातर्फे जिल्ह्यात “स्वच्छ जल से सुरक्षा’ या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ३१ िडसेंबरपर्यंत राबवण्यात येणाऱ्या या अभियानादरम्यान नळ पाणीपुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोतांचे जीओ टॅगिंग करण्यात येणार आहे. तसेच पाणी तपासणी करून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता निश्चित केली जाणार आहे.

जिल्ह्यातील विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन िज.प.कडून केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२२-२३ व स्वच्छ जल से सुरक्षा या दोन्ही अभियानाचा शुभारंभ केला आहे. शुभारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक, उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह व पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.

अभियानासाठी जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मिलिंद मोरे , कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक लेखाधिकारी संदीप नृपनारायण, जिल्हा कक्षाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ओमप्रकाश बरेठी, राजेश डहाके, अर्चना डोंगरे, राहुल गोडले, सागर टाकले, प्रल्हाद पाखरे, प्रवीण पाचपोर, ममता गणोदे, रुपाली देशमुख, बबिता पारसकर, श्रीकांत जगताप आदी परिश्रम घेत आहेत.

उपाय याेजना हाेणार : महिलांच्या मदतीने एफटीके किटद्वारे पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येईल. यासाठी प्रत्येक गावात पाच महिलांची निवड करून त्यांना एफटीकेबाबत त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. पाणी नमुने तपासणीच्या नोंदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंदवल्या जाणार आहे. किट तसेच प्रयोगशाळेमधील पाणी नमुने तपासणीत दूषित आढळून आलेल्या स्त्रोतांवर उपचारात्मक उपाय योजना केले जातील.

प्रयाेगशाळेत तपासणी : प्रत्येक नळ पाणी पुरवठा योजनांच्या स्त्रोतांची मान्सून पश्चात कालावधीतील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील सर्व जलसुरक्षकांच्या सहाय्याने पाणी नमुने गोळा करून जिल्हा अथवा उपविभागीय प्रयोगशाळेत पोहाेचवले जातील. जिल्हा अथवा उपविभागीय प्रयोगशाळेत प्राप्त झालेले सर्व पाणी नमुने तपासणी करून वाॅटर क्वाॅलिटी एमआयएस व हर घर जल अॅपवर तपासणी अहवाल सादर करण्यात येईल.

पाणीपुरवठा योजनांची क्षमता वाढण्यासाठी प्रयत्न
अभियानामध्ये जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे रासासायनिक, जैविक परीक्षण, एफटीके किटद्वारे महिलांच्या सहभागाने महिनाभराच्या अभियान काळात पाणी गुणवत्ता तपासणी केली जाणार आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यात अस्तित्वातील सर्व नळ पाणीपुरवठा योजना व रेट्रोफिटिंग करण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रमुख स्त्रोतांचे “हर घर जल’ या मोबाइल ॲपद्वारे पूर्ण करण्यात येईल. नवीन योजनांच्या स्त्रोतांचे काम पूर्ण झाले असल्यास अथवा स्त्रोत अस्तित्वात असल्यास त्याचेही जीओ टॅगिंग करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...