आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान‎:महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या‎ जयंतीनिमित्त राबवले स्वच्छता अभियान‎

विधायक उपक्रम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला‎ विष्णुपंत खेंडकर माध्यमिक विद्यालय,‎ स्व. यमुनाबाई खेंडकर मराठी प्रा. शाळा‎ व स्व. नारायणराव खेंडकर काॅन्व्हेट‎ येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली. विद्यार्थ्यांनी ‎ शाळेत स्वच्छता अभियान राबवले. ‎विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वाढलेले ‎गवत व गांजर गवत काढून निर्मूलन‎ केले. याप्रसंगी शाळेतील मुला व‎ मुलींचा सक्रिय सहभाग होता. या उपक्रमातून ''स्वच्छ भारत, समृद्ध’‎ भारत अभियानाला चालना देऊन‎ महात्मा गांधी यांच्या उपक्रमास चालना ‎दिली.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे‎ सचिव मुख्याध्यापक नीलेश खेंडकर‎ उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख‎ अतिथी म्हणून उपाध्यक्ष व‎ मुख्याध्यापक अल्केश खेंडकर हाेते.‎ ‎

‎ महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री यांच्या‎ प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून‎ अभिवादन केले. हा दिवस अंहिसा दिन‎ म्हणून पाळला जावा, असे आवाहन‎ नीलेश खेंडकर यांनी केले. कार्यक्रमाचे‎ संचालन आशा हिवरकर यांनी केले.‎ सुरेश सुरत्ने यांनी आभार मानले.‎ कार्यक्रमासाठी शिक्षक प्रज्ञानंद थोरात,‎ गोपाल वानखडे, उषा जगदाळे, माया‎ खोडके, कांचन वानखडे, मनीषा‎ अंभोरे, मीरा सरदार, भारती लांजेवार,‎ प्रशांत काळे यांच्यासह शिक्षक व‎ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य‎ लाभले.‎ जिल्हाधिकारी कार्यालयात‎ गांधी जयंतीनिमित्त अभिवादन‎

अकोला राष्ट्रपिता महात्मा गांधी व‎ माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री‎ यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी‎ कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन‎ अभिवादन केले. लोकशाही सभागृहात‎ हा कार्यक्रम झाला.‎ निवासी उपजिल्हाधिकारी संजय‎ खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.‎ नीलेश अपार, जिल्हा माहिती‎ अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या‎ हस्ते प्रतिमेस सुताचा हार व पुष्पहार‎ अर्पण करुन अभिवादन केले. या वेळी‎ जिल्हा नाझर मोहन साठे, नायब‎ तहसीलदार अतुल सोनवणे, ज्योती‎ नारगुंडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील‎ अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...