आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:आदर्श शिक्षक पुरस्काराचे केले तरण; अखेर एका वर्षानंतर झाला कार्यक्रम, पटसंख्या वाढवणाऱ्या शाळांचाही करण्यात आला सन्मान

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षांपासून रखडलेला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील सात शिक्षकांना जिल्हा परिषदेत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी ५ सप्टेंबर शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यात पात्र शिक्षकांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह रोख रक्कम व शिक्षिका असेल तर साडीचोळी भेट दिले जाते. मात्र गत दोन वर्षात कोरोनामुळे पुरस्कार रखडले होते. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आिण निर्बंधही शिथिल झाल्याने पुरस्कार सोहळा पार पडला. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या छत्रपती राजश्री शाहू महाराज सभागृहात आयोजित केला. कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सावित्रीबाई राठोड, सभापती स्फूर्ती गावंडे, जि.प. सदस्य पुष्पा इंगळे, राम गव्हाणकर, विनोद देशमुख, वर्षा वझीरे, सीईओ सौरभ कटियार, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, विस्तार अधिकारी विनोद मानकर, अलीम देशमुख उपस्थित होते.

यांना दिला पुरस्कार : पुरस्कार सात शिक्षकांना प्रदान केला. यात रजनी राजेश मेतकर सहाय्यक शिक्षिका जि.प शाळा लोणी, मो. अलीम शेख सिकंदर सहाय्यक शिक्षक जि.प शाळा धोत्रा शिंदे उर्दू, दिनेश ठाकरे उच्च श्रेणी मु.अ जि.प शाळा देगाव, प्रशांत वामनराव शेवतकर स. शिक्षक, जि.प. शाळा हातोला, अविनाश ओंकारराव देशमुख पदवीधर शिक्षक जि.प. शाळा माळेगाव बाजार, प्रवीण मुरलीधर चिंचोळकर विशेष शिक्षक जि. प. शाळा तळेगाव खु., मो. साजिद प्यारे साहेब माध्यमिक विभाग जि.प. शाळा बाळापूर.

या शाळांची वाढविली पटसंख्या : मराठी शाळांतीस पटसंख्या वाढीसाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पटसंख्येत वाढ करणाऱ्या २२ जि.प. शाळांचा गौरव केला. यावेळी जि.प. शाळा म्हैसांग, कोळंबी बोरगाव मंजू उर्दू क्र. २, उमरा, शहापूर मंडाळा, दधम, व्याळा पेठ, टाकळी खोजबोळ बार्शीटाकळी उर्दू कन्या, जांभरून, वरखेड खुर्द, बोरगाव, कंझारा,बोर्डी, चोंढी, बाभुळगाव, सस्ती, अडगाव मुले, शिरसोली मराठी, सौंदळा या शाळांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...