आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाकालपट्टी:एसटीच्या काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार; एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळातील वेतनप्रकरण

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य मार्ग परविहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांचे संप काळातील वेतन काढण्याच्या प्रकरणात आतापर्यंत अधिकारी, कर्मचारी मिळून ५ जणांवर कारवाई केली. मात्र, या प्रकरणात पुन्हा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यात आस्थापना, लेखा विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश असणार असल्याची माहिती आहे.

राज्य परिमंडळ विभागातील संप काळात गैरहजर ६१ कर्मचाऱ्यांचे पगार काढले. एकूण ३१ लाखाची ही रक्कम आहे. या गंभीर चुकीबाबत परविहन मंडळाकडून विभाग नियंत्रक चेतना खिरवडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर शुक्रवारी वेतन संबंधी अस्थापना विभागातील अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

एसटी कर्मचारी पाच महनिे संपावर होते. नोव्हेंबरपासून पुकारलेला हा संप नुकताच मिटला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना संप काळातील वेतन न देण्याचे आदेश परविहन मंडळाने दिले होते. तरी अकोला विभागामध्ये ६१ संपकरी कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात आले. मागील महनि्याच्या ७ एप्रिल रोजी या कर्मचाऱ्यांच्या बँकेत संप काळातील दोन महनि्याच्या पगाराची रक्कम वळती करण्यात आली. वेतन देण्याचे आदेश नसताना कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यात आल्यामुळे राज्य परविहन मंडळाकडून कारवाईचे सत्र सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...