आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य संचालकांना शिवीगाळ:हिंगोलीचे आमदार बांगरांवर कारवाई करा; तेली समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आराेग्य संचालक डाॅ. नितीन आंबाडेकर यांना हिंगाेलीचे आमदार संताेष बांगर यांनी शिविगाळ केली असून, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी तेली समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली.

तेली समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनानुसार हिंगाेलीचे आमदार संताेष बांगर यांनी 30 ऑगस्ट राेजी डाॅ. नितीन अंबाडेकर यांना फाेन केला हाेता. मात्र ते आराेग्य विभागाच्या महत्त्वाच्या बैठकित असल्याने आमदार बांगर यांचा फाेन स्वीकारू शकले नाहीत. मात्र बैठक संपताच डाॅ. अंबाडेकर यांनी आमदारांना फाेनवरून संपर्क साधला. आ. बांगर यांनी राज्यातील 102 क्रमांकच्या रुग्णवािहकांचा प्रश्न माडला आिण रुग्णवाहिका चालकांना राज्यात वेतन तिळत नस्लयाने ते संपावर आहेत, याबाबत विचारणा केली. त्यांनी डाॅ. अंबाडेकर यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आराेप निवेदनात केला. उपराेक्त घटनेचे पडसाद राज्यातील तेली समाजात उमटले असून, संतापाची लाट उसळली आहे. तसेच या घटनेचा जिल्हा आराेग्य अधिकारी संघटनेनेही निषेध व्यक्त केला आहे. कर्तव्यतत्पर असलेल्या डाॅ. अंबाडेकर यांच्यासाेबत बाेलताना अर्वाच्च भाषा वापरल्याने आमदार संताेष बांगर यांच्यावर भादंवि व अन्य कायद्यांनुसार कठाेर कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मागणी करणाऱ्यांमध्ये देवाशिष काकड, डाॅ. याेगेश साहू, दिलीप नायसे, महादेव गुल्हाने, दिलीप हांगेड, दिलीप क्षिरसागर, विष्णू मेहरे, बालमुकुंद भिरड, गणेश रायपुरे, सुधाकर झापर्डे, माणिकराव नालट, रमेश गाेतमारे, दीपक इचे, प्रमाेद देंडवे, संजय वानखडे, संजय जिरापुरे, अभय बिजवे, प्रकाश डवले, गजानन बाेराळे, रामेश्वर वानखडे, राजेश वानखडे, ललीत भगत, सुधीर साकरकार, याेगेंद्र गाेतमारे, प्रवीण झापर्डे, राजेश असलमाेल, दीपक भिरड, ज्ञानेश्वर रायपुरे, नितीन झापर्डे, तुषार भिरड, किरण बाेराखडे, राजेंद्र गाेतमारे, विकास राठाेड, अनंत साकरकार, प्रशांत शेवतकार, प्रमाेद चाेपडे, गणेश पाेलखरे, मनाेज जुमळे, राहूल धनभर, विजय थाेटांगे, विशाल गमे, गाेपाल झापर्डे, मनीष थाेटांगे, अतुल राठाेड, प्रतीक देंडवे, किशाेर वानखडे,विशाल इचे, पुष्पा वानखडे, कल्पना तायडे, कल्पना अडसुले, साेनली नालंदे, अरूण पाटील आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...