आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Take Action To Make The Solar Energy Project Operational, A Letter From The Municipal Executive Engineer To The Director General Of MEDA

मनपाचे आर्थिक नुकसान:सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी कारवाई करा, कार्यकारी अभियंत्याचे मेडाच्या महासंचालकांना पत्र

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महान जलशुद्धीकरण केंद्र आणि शिलोडा मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प तातडीने कार्यान्वित होईल, यासाठी तातडीने कार्यवाही करा आणि महापालिकेचे आर्थिक नुकसान वाचवा, या आशयाचे पत्र पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या महासंचालकांना पाठवले आहे.

का झाला खोळंबा?

सौर ऊर्जा प्रकल्पाचा डीपीआर मेडा (महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण) मार्फत शासनाकडे पाठण्यात आला होता. 1400 किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. यापैकी 990 केव्ही क्षमतेचा प्रकल्प महान येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तर उर्वरित प्रकल्प शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरात उभारण्यात आला. मेडाने हे काम बेल कंपनीला दिले होते. दोन्ही सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. केवळ नेट मिटरींगमुळे या प्रकल्पाचे कार्यान्वयन रखडले आहे. या प्रकल्पासाठीचा 6 कोटीचा निधी यापूर्वीच वळता केला आहे.

निधी मागणीत तफावत

महाऊर्जाकडून मागितलेला 47 लाख रुपयाच्या अतिरिक्त निधी पैकी 32 लाख 90 हजार रुपयाचा निधी मार्च 2022 ला वळता केला आहे. मात्र, अद्याप पर्यंत प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. सौरऊर्जा जिल्हा कार्यालय आणि मुख्य कार्यालयाकडून केलेली निधीची मागणी यात तफावत असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबतच योग्य तो खुलासा करुन तातडीने सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करावा, अशी मागणी कार्यकारी अभियंत्यांनी केली आहे.

महिन्याला 18 लाखांचे नुकसान

सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील 15 लाखाचे तर शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्रातील 3 लाख रुपयाचे विद्युत देयकाचा भरणा मनपाला करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...