आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीटभट्टी व्यावसायिकांना आवश्यक परवाना सहज व त्वरित मिळेल, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात याव्यात, असा आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शनिवारीदिला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेतला. वीटभट्टी वैध करून घेण्यासाठीच्या 70 अर्ज छाननीसाठी सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आले. लवकरच छाननीनंतरच चित्र स्पष्ट होणार असून, मंत्री. शिंगणे यांच्या नवीन आदेशानंतर महामार्गलगतच सुरू असलेल्या भट्टयांवर कोणती कार्यवाही होणार हे औत्सुक्याचे राहणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर ठिकठिकाणी वीटभट्ट्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी प्रदुषणासह अन्य नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. वीटभट्टींच्या परवानगीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, याकरिता पर्यावरण विवभागाची अनुमती असणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाने मार्च 2022 मध्ये आदेश जारी करून सूचनाही केल्या होत्या. दरम्यान शनिवारी अकोल्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत वीटभट्यांना सहज त्वरित परवाना मिळेल, यासाठी उपाय योजना करण्याचा आदेश दिला. बैठकीला आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी निमा अरोरा, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, हरिभाऊ भदे, सामाजिक कार्यकर्ता डॉ. आशा मिरगे आदी उपस्थित होते.
नियमांना ितलांजली
१) वीट भट्टी गावठाणापासून ८०० मीटर अंतराचे अात असणे, भट्टी राष्ट्रीय व राज्य मार्ग, रेल्वे मार्गापासून २०० मीटर असणे, दाेन वीट भट्टींमध्ये १ कि.मी.चे अंतर असणे अावश्यक अाहे. मात्र बाळापूर, अकाेट राेडवर अनेक ठिकाणी रस्त्यालगत भट्टी सुरू अाहेत.
२) वीटभट्यांवर धुळ न हाेण्यासाठी चिमणीही बसवणे अावश्यक अाहे. मात्र बहुता:श ठिकाणी िचमणीच नाही.
पावसाळ्यात हाेणार कार्यवाही ?
काही िदवसांपासून िजल्ह्यात वीटभट्यांचा िवषय तापला अाहे. वीटभट्टी व्यावसाियकांना अर्ज करण्यासाठीची मुदत दाेन वेळा वाढविण्यात अाली हाेती. अखेरची मुदत ३० एप्रिलपर्यंत अाली हाेती. सर्व तहसीलदारांना प्राप्त झालेले हे अर्ज त्यांनी छाननीसाठी एमपीसीबीकडे वर्ग केले. छाननीनंतर जिल्हा खनीकर्म िवभाग कार्यवाहीचा िनर्णय घेईल. मात्र लवकरच पावसाळा सुरू हाेणार असून, वीट भट्यांवर पावसाळ्यात कार्यवाही हाेणार काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.