आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादरवर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी वादळी वारे, वजिांच्या कडकडाट पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी वजिा कोसळून जविीतहानी होते. जनावरे दगावतात. म्हणून अशा दविसात वजिांपासून बचावासाठी सुरक्षात्मक खबरदारीचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
मेघगर्जना, वादळी वारा आणि वजिा कोसळणे ही पावसादरम्यानची नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे वजिा होणे किंवा कोसळण्याची प्रक्रिया थांबवता येणारी नाही. असे असले तरी वजिा कोसळून होणारी जविीतहानी मात्र खबरदारी घेतली तर रोखता येऊ शकते. त्यामुळे शेतकरी, शेतमजूरांनी या काळात खबरदारी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. घर्षणामुळे वदि्युत भार तयार होणे आणि अर्थिंगद्वारे हा भार जमिनीत जाणे अशीच प्रक्रिया आकाशात घडते. जमिनीचा भाग हा ऋण भारीत असतो तर ढगांमधील जलबिंदू किंवा वातावरण हे धनभारीत असते. तिथे हा भार तयार होतो. तेथे वजि कोसळते.
दरम्यान ढगात तयार होणाऱ्या सर्वच वजिा या जमिनीवर कोसळत नाहीत तर सुमारे ९० ते ९५ टक्के वजिा या आकाशातच होतात नि ढगात कोसळतात. वीज कधी, कुठे कोसळेल, हे निश्चित सांगता येण्यासारखे नसले तरी वजिांच्या आतापर्यंतच्या अभ्यासानुसार काही ठिकाणी निश्चित आहेत. जसे मैदाने, झाडे, टॉवर्स, जलाशयांजवळ, उंच डोंगरावर वजिांमुळे दुर्घटना घडतात, अशी माहिती श्री शविाजी महावदि्यालयातील भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. दत्ता भारसाकळे देतात.
यापासून राहा लांब
विजा चमकत असताना विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर आदीजवळ उभे राहू नका. वाहनांमध्ये असाल तर तत्काळ सुरक्षित ठिकाण गाठा. एका वेळी अनेक लोक एकत्र थांबू नका. पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोनला स्पर्श टाळा. मोबाइलचा वापर टाळा
ही काळजी घ्यावी
मेघगर्जनेसह वजिा आणि पावसाच्या वातावरणाची पूर्व कल्पना येताच शेतकरी- शेत मजूरांनी त्वरीत शेताजवळील घराचा आसरा घ्यावा.
पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक किंवा कोरडा पालापाचोळा घ्या.
दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
ओलीताचे शेतशविार किंवा तलावामध्ये काम करणाऱ्यांनी तत्काळ बाहेर यावे.
उंच झाडापासून लांब उभे राहावे.
मोकळ्या जमिनीवरील खोलगट भागात गुडघ्यात वाकून बसा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.