आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकर यांचे आवाहन

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माती परिक्षणाच्या आधारे खतांचा वापर, कीड नियंत्रणासाठी निरीक्षणवृत्ती तसेच शेतीपूरक व्यवसाय ही शेतीचा आर्थिक पाया भक्‍कम करणारी त्रिसूत्री आहे. निंभारा येथील प्रयोगशील शेतकरी बाळू नानोटे यांनी याचा अंगीकार केला असून इतरांनी देखील त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकर यांनी केले.

बाळू नानोटे यांच्या शेतातील एकात्मिक कीड नियंत्रण प्रयोगांची पाहणी करताना वाशीमकर बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय चांदूरकर, कृषी पर्यवेक्षक अजय चव्हाण, कृषी सहाय्यक गावंडे उपस्थित होते. बाळू नानोटे यांनी मातीचा पोत राखला जावा यावर भर दिला आहे. त्याकरिता बायोडायनामीक कंपोस्ट, कुजलेले शेणखत यासह जैविक निविष्ठांचा वापर त्यांच्याव्दारे केला जातो. माती परिक्षणातही त्यांनी सातत्य राखले आहे. यामाध्यमातून जमीनीत उपलब्ध अन्नघटकांची माहिती होते.

जमीनीला आवश्‍यक त्याच अन्नघटकाचा पुरवठा करणे शक्‍य होत असल्याने उत्पादकता खर्च मर्यादीत राहतो. किडरोगाचे वेळीच निवारण करता यावे याकरीता कामगंध तसेच चिकट सापळे त्यांनी आपल्या शिवारात लावले आहेत. त्याचे निरीक्षण करुन पिकावर किडरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असल्यास जैविक पध्दतीने त्याचे नियंत्रणावर बाळू नानोटे यांनी भर दिला आहे. सोयाबीन, कपाशी सोबतच काही क्षेत्रावर मूग, उडीद यासारखी पीके त्यांच्याव्दारे घेतली जातात. शेतीपूरक दुग्ध व्यवसायातही त्यांनी सातत्य राखले आहे. त्यांच्या या प्रयोगशीलतेची दखल घेत कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या शिवाराला भेट दिली. यावेळी त्यांच्या शेतावरील विविध बाबी अभ्यासण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...