आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील रखडलेल्या जलकुंभाचे ले-आऊटचे काम पुन्हा थांबवले:जलकुंभ बांधण्यास विरोध असणारा गट आयुक्तांची घेणार भेट

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला शहरातील अमृत योजने अंतर्गत जुने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानातील रखडलेल्या जलकुंभाचे काम सुरू करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात लेे-आऊट आखण्यात आले. मात्र जलकुंभ बांधण्यास विरोध असलेल्या गटाने आयुक्तांची भेट घेण्यास मुदत द्या, तो पर्यंत जलकुंभाचे काम करू नका, अशी मागणी केल्याने सुरू केलेले खोदकामही थांबवण्यात आले.

अमृत योजने अंतर्गत 110 कोटी रुपये खर्च करुन शहरात पाणी पुरवठा योजनेचे सबलीकरण करण्यात आले. यात जिर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, काही भागात जलवाहिन्या अंथरणे, जलशुद्धीकरण केंद्रातील विविध दुरुस्ती तसेच शहरात (शहराच्या मुळ हद्दीत) आठ जलकुंभ बांधण्याचे नियोजन होते. यापैकी सात जलकुंभाचे काम पूर्ण होऊन हे जलकुंभ कार्यान्वित झाले. मात्र जुने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानातील जलकुंभाचे काम परिसरातील नागरिकांनी विरोध केल्याने रखडले होते.

कंत्राटदाराने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. महापालिकेने पोलिस बंदोबस्ताचा खर्चाचा भरणाही केला होता. मात्र यात अनेक दिवस गेले. त्यामुळे या जलकुंभाचे काम रखडले. प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांशी वारंवार चर्चा केली. अखेर कंत्राटदाराने कामास नकार दिल्याने महापालिकेने जलकुंभाच्या कामासाठी निविदा बोलावल्या. या निविदांना स्थायी समितीच्या सभेत देण्यात आली. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसरात जलकुंभ बांधण्यास परिसरातील काही नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे जलकुंभाचे काम रखडले होते.

अखेर पोलिस बंदोबस्त मिळाल्याने 6 जुन रोजी जलकुंभाचे काम करण्यासाठी ले-आऊट आखण्यात आले. या दरम्यान जलकुंभ बांधण्यास विरोध असलेल्या गटाने पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांची भेट घेवून जलकुंभ या जागे ऐवजी दुसऱ्या जागेत बांधण्याची मागणी केली. तसेच याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी वेळ द्या, अशी मागणी केली. त्यामुळे जलकुंभाचे काम थांबविण्यात आले. आयुक्तांशी चर्चा झाल्या नंतरच आता या जलकुंभाचे काम सुरू करण्यात येईल.

18.50 लाखाने वाढणार क्षमताअमृत योजने अंतर्गत जुने शहरात चार जलकुंभ बांधण्यात येणार होते. तीन जलकुंभाचे काम झाले. आता चौथ्या जलकुंभाचे काम सुरू होत आहे. या जलुकंभाची साठवण क्षमता 18 लाख 50 हजार असल्याने जुने शहरातील विविध भागांचा पाणी पुरवठा सुरळीत होणार असून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होईल.

वाढीव खर्च जुन्या कंत्राटाराकडून वसुल केला जाईल

तीन वर्षानंतर या जलकुंभाचे काम होत आहे. त्यामुळे बांधकाम साहित्यात वाढ झाल्याने मागील कंत्राटदारास ज्या दराने काम देण्यात आले होते. त्यापेक्षा अधिक दराने हे काम द्यावे लागणार आहे. हा वाढलेला खर्च मागील कंत्राटदाराच्या बँक गॅरटीतून कपात केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...