आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक विस्कळीत:टँकरची दुचाकीला धडक; आठ वर्षीय बालिकेचा मृत्यू; टँकर चालकास अटक

मूर्तिजापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील कुरुम गावाजवळ दुचाकीला टँकरने मागून धडक दिल्यामुळे दुचाकीवरील ८ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली.राष्ट्रीय महामार्गावरील मधापुरी येथून कुरुमकडे येत असलेली दुचाकी क्र. एमएच २७ सीआर ६५८५ ला कुरुम परिसरात टँकर क्रमांक जी जे.०६ एव्ही ९९२३ ने अमरावतीकडून मूर्तिजापूर येथे जात असताना पाठीमागून धडक दिली.

यामध्ये दुचाकीवरील पिंकू अंबादास सोळंके वय ८ रा. मधापुरी या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. पिंकूचे वडील अंबादास सोळंके हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी घटनास्थळी भेट दिली. हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर टिकार, उमेश हरमकर, एएसआय नलावडे, पंकज इंगळे यांनी वाहतूक सुरळीत केली.

बातम्या आणखी आहेत...