आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:उत्कृष्ट कामगिरीबद्दल कार्यशाळेत‎ शिक्षक चंद्रकांत गव्हाणे सन्मानित‎

बार्शीटाकळी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎तालुक्यातील पिंजर येथील माध्यमिक‎ शाळेतील राष्ट्रीय पातळीवर‎ पारितोषिक विजेते शिक्षक चंद्रकांत‎ वसंत गव्हाणे यांचा गणित कार्यशाळेत‎ अकोला येथे माध्यमिक‎ शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर‎ ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.‎ यानिमित्त चंद्रकांत गव्हाणे यांच्या‎ उत्कृष्ट कामगिरीबद्दल बार्शीटाकळी‎ येथील खालीद बिन वालिद शिक्षण व‎ कल्याणकारी संस्थेच्या वतीने त्यांचे‎ सावित्रीबाई फुले विद्यालय पिंजर येथे‎ शाल व शिरफळ देऊन संस्थेचे‎ उपाध्यक्ष डॉ. शाहीद इक्बाल खान‎ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.‎

यावेळी अकोला गणित अध्यापक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष उमेश‎ रेळेर, सचिव गायकी, उपाध्यक्ष रमेश‎ धुळे, माधव मुन्शी, कैलास सांगळे,‎ शशिकांत बांगर, पाथरीकर, नारायण‎ गावंडे व सर्व अकोला जिल्ह्यातील‎ गणित शिक्षक बंधू भगिनींच्या‎ उपस्थितीत सत्कार केला. त्याबद्दल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पिंजर येथे महसूल विभागाने सुद्धा‎ त्यांना सन्मानित केले. त्यावेळी मंडळ‎ अधिकारी भराडी तलाठी कुलकर्णी‎ त्यांचे मित्र परिवार राठोड, पाटील,‎ कराळे, प्रदीप गावंडे, राजू मित्र‎ परिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन सोहेल यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...