आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन कार्यक्रम:गुलाम नबी आझाद कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिन; शिक्षक दिनी पुस्तकाचे प्रकाशन

बार्शीटाकळी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलाम-नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षक दिन कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. मंचावर प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार, डॉ. आर. आर. राठोड, उपप्राचार्य डॉ. अमित वैराळे, डॉ. के. आर. नागुलकर, महिला रा. से. यो कार्यक्रम अधिकारी, डॉ. वैशाली कोटंबे, प्रा. युवराज काळे, डॉ. दिपक चौरपगार उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी कला, विज्ञान, वाणिज्य शाखेचे व ज्युनिअर शाखेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आणि कांचन अंकुलेकर व शालिनी राठोड यांनी आपल्या स्वागतगीतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच डॉ. के. आर. नागुलकर यांचे पुस्तक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले. डॉ. नागुलकर यांचा वाढदिवस या निमित्ताने त्यांचे शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार यांनी सत्कार व पुस्तकाचे विमोचन केले. तेव्हा बदलत्या काळानुरुप शिक्षकांची जबाबदारी तसेच विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी असे समीकरण डॉ. मधुकरराव पवार यांनी व्यक्त केले.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा कार्यकाळ ते त्यांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सांगितलेली चतुर्थी कार्यक्रम आपण आपल्या अंगी आणल्यास नक्कीच विद्यार्थी घडतील असा विश्वासही व्यक्त केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी हा पुन्हा आपल्या अभ्यास मार्गावर आणण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे, असे बोलत सर्वच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सर्वांच्या समवेत महाविद्यालयातील शिस्त ठेवण्यासाठी शिक्षक दिनी डॉ. मधुकर पवार यांच्या समवेत शपथ घेण्यात आली. महादेव खंडारे बीए भाग एक तसेच मेहेक शेख, बीएससी भाग एक या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिपक चौरपगार यांनी केले. तर सूत्रसंचालन वैष्णवी कुरोडे हिने केले, आभार शालिनी राठोड हिने केले. कार्यक्रमासाठी आदित्य खाडे, प्रतीक मोहोड, सुप्रिया गवई, पंजाब जाधव, मनोहर खाडे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...