आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:शिंदे गटातून शिवसेनेतील शिक्षकांचा केला सत्कार

अकाेला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे शिवसेनेसह शिक्षकांसह अन्य गुरुजींचाही शिक्षक दिनी सत्कार करण्यात आला. त्यामुळे शिंदे गट आता शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातही सक्रिय झाल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.

जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पाडत शिंदे गटाने कार्यकारीणीही घाेषित केली असून, विविध क्षेत्रात पदाधिकारी सक्रिय हाेत आहेत. गत आठवड्यात मंत्री अब्दुल सत्तार यांचाही कार्यक्रम झाला हाेता. काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करीत मदतीची मागणीही केली हाेती. दरम्यान ५ सप्टेंबर राेजी शिक्षक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, संस्थांमध्ये जात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. एलआरटी महाविद्यालय, महेरबानो महाविद्यालय, डवले महाविद्यालय ,श्रीमती एलडीएन महाविद्यालय हिंगणा येथील शिक्षकांसह अन्य माजी शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महानगर प्रमुख योगेश अग्रवाल , पश्चिम शहर प्रमुख मुरलीधर सटाले, उपशहर प्रमुख गणेश गोगे, प्रफुल्ल तायडे, प्राचार्य राजेंद्र नेरकर, गजानन रोकडे , शशिकांत सापधरे ,कमल खरारे, सचिन पाचपोर, अजय सोळंके, हितेश राठोड, रवी बोकाडे यांच्यासह शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...