आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांनी विचलीत न होता कार्य सुरू ठेवावे:गुरूजींसाठी धावून आले, माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांनी कोणाच्याही बोलण्याने विचलित न होता आपले कार्य विनासायास सुरू ठेवावे; मी सभागृहाबाहेरच नव्हे तर विधी मंडळाच्या सभागृहातही आपली बाजू सक्षमपणे मांडण्यास बांधील आहे, अशी ग्वाही पदवीधर मतदार संघाचे भाजप आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांनी रविवारी दिली.

सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील भाजपचेच आमदार प्रशांत बंब आणि काही शिक्षकांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पृष्ठभूमीवर त्यांच्याच पक्षातील आ. डाॅ. पाटील यांनी दिलेली ग्वाही शिक्षकांसाठी दिलासा देणारी मानली जात आहे. त्यांनी आ. बंब यांचे थेट नाव न घेता शिक्षकांच्या घेतलेल्या बाजूमुळे राजकीय चर्चा रंगली आहे. डाॅ. पाटील हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे (प्राथमिक विभाग) रविवारी आ​​​​​​​याेजित शिक्षक दिन व कृतीशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते.

शिक्षक दिनानिमित्त आयाेजित कृतीशील शिक्षक पुरस्कार साेहळा ल. रा. तो. वाणिज्य महाविद्यालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीजीई साेसाटीचे अध्यक्ष अ‍ॅ​​​​​​​ड. मोतिसिंह मोहता हाेते. प्रमुख अतिथी डॉ. अपर्णा पाटील, डॉ. नरेश बजाज, प्राचार्य सुनिल पांडे, प्राचार्य जयंत बोबडे, प्राचार्य किरण खंडारे, फादर मॅथ्यू कॅरेकल, सिस्टर निता फर्नांडिस, वंदना बोर्डे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर यांनी तर आभार कार्यवाह सचिन काठोळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देवेंद्र वाकचवरे व संजीवनी अठराळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी अतुल पिलात्रे, गजानन काळे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन , रूजिता खेतकर, नितीन बंडावार, श्याम कुलट यांनी परिश्रम घेतले.

पालकत्त्व स्वीकारले

विभागातील शिक्षकांचे मी पालकत्व स्विकारले असून मी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे भाजप आ​​​​​​​मदार डाॅ. पाटील म्हणाले. शिक्षकांनी कोणाच्याही बोलण्याने विचलित न होता आपले कार्य विनासायास ,निरंतर सुरू ठेवावे. मी केवळ सभागृहाबाहेरच नव्हे; तर विधीमंडळाच्या सभागृहातही आपली बाजू सक्षमपणे मांडण्यास बांधील आहे, असेही तेम्हणाले.

बातम्या आणखी आहेत...