आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Telhara Shegaon Bus Hits Tree; The Telhara Adasul Road Is Playing With The Lives Of The People, Neglected By The Administration |marathi News

अपघात:तेल्हारा-शेगाव बसची झाडाला धडक; तेल्हारा-आडसूळ रस्ता खेळतोय जनतेच्या जीवाशी, प्रशासनाचे दुर्लक्ष

तेल्हारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल्हारा आगाराच्या तेल्हारा-शेगाव (एमएच ४०, ९५१४) बसच्या समोर अचानक आलेले वाहन चुकविण्याच्या प्रयत्नात बसने झाडाला धडक दिली. मनात्रीजवळ झालेल्या या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी, ९ मे रोजी सकाळी ८ वाजता तेल्हारा आगाराची बस तेल्हारा आगारातून शेगावकरीता निघाली. चालक ए. ए. खान आणि वाहक सविता सिरसाठ यांनी बस रवाना केली. ही बस मनात्री या गावाजवळ पोहोचताच या बससमोर अचानक एक वाहन आले असता अरुंद रस्त्यावरून त्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात असतानाच रस्त्याशेजारील लिंबाच्या झाडावर संबंधित बस जाऊन आदळली. यामध्ये बसचा समोरील भाग बराच ठेचला गेल्याने आर्थिक नुकसान झाले. या बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते. त्यापैकी दोन महिलांना दुखापत झाली असता तेल्हारा आगाराच्या बसमधूनच जखमींना तेल्हारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींना प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत तेल्हारा आगाराकडून देण्यात आल्याचे तेल्हारा आगार प्रमुखांनी ‘दवि्य मराठी’शी बोलताना सांगितले. तेल्हारा-आडसुळ रस्त्यावर असे किरकोळ आणि गंभीर अपघात नित्यानेच होत असल्याने जनजीवन धोक्यात आले आहे. या रस्त्यांसाठी अनेकदा आंदोलने, मोर्चे व उपोषणे झालीत परंतु अत्यापही योग्य ती दखल न घेण्यात आल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

तर वाहतूक बंदचा विचार ः आम्ही तेल्हारा आडसुळ, तेल्हारा-मुंडगाव-अकोट, तेल्हारा-हविरखेड-अकोट, तेल्हारा-वरवट-संग्रामपूर या रस्त्यांना वैतागलो असून, चालकांना बसेस चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच बसेसचे सतत किरकोळ ते गंभीर नुकसान सुरुच राहते. तेल्हारा आडसुळ रस्ता असाच राहिला तर या रस्त्यावरील बसेसची संपूर्ण वाहतुक बंद करण्याचा विचार तेल्हारा आगार करत आहे, अशी माहिती तेल्हारा येथील आगार प्रमुख संतोष वानरे यांनी दिली.

शासन प्रशासन उदासीन
तेल्हारा आडसुळ रस्त्यावर वाहने चालवताना चालक असुरक्षित आहेत. कारण समोरासमोर वाहने आली तर एकमेकांना जायला जागा नसल्याने अडचणी निर्माण होऊन किरकोळ वाद,अपघात सुद्धा होतात. या रस्त्यांसाठी अनेकदा मोर्चे, आंदोलन, उपोषणे झाली परंतु या रस्त्यांबाबत शासन प्रशासन हे उदासीन असल्याचे स्पष्ट झाले.
विशाल नांदोकार, सामाजिक कार्यकर्ते, तेल्हारा.

बातम्या आणखी आहेत...