आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैशाख वणवा:वर्ध्यात सूर्य कोपला; तापमान 44.9 अंश सेल्सिअस‎; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी | वर्धा‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यानंतर वर्धेत गुरुवारपासून, ‎उष्णतेची लाट उसळली आहे. दररोज ‎ ‎ शहर उष्ण होत असून, रविवारी ४४.९ ‎ ‎ अंश तापमानाची नोंद करण्यात‎ आली. जिल्ह्यात पुढील काही दिवस ‎ ‎ उष्णतेची लाट राहणार असल्याचा ‎ ‎ हवामान खात्याने अंदाज वर्तवला‎ आहे. उष्णतेमुळे होणारे गंभीर‎ परिणाम टाळण्यासाठी काळजी‎ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी‎ राहुल कर्डिले यांनी केले आहे.‎ रविवार हा बाजाराचा दिवस‎ असूनही, बाजारपेठत व शहरातील‎ रस्त्यांवर सायंकाळपर्यंत शुकशुकाट‎ दिसून आला. उन्हाळ्यात घरा बाहेर‎‎ पडल्यानंतर जास्तीत जास्त पाणी‎ प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती‎ कपडे वापरावीत. बाहेर जाताना‎ चष्मा, छत्री, टोपी, बुट व चप्पलचा‎ वापर करावा. प्रवास करताना‎ पाण्याची बाटली सोबत घ्यावी.‎ उन्हात काम करीत असलेल्या‎ व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा‎ छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या‎ कपड्यांनी डोके, मान व चेहरा‎ झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे‎ प्रमाण कमी होत असल्यास‎ ओआरएस, घरी बनवण्यात आलेली‎ लस्सी, तोरणी, लिंबूपाणी, ताक‎ इत्यादीचा वापर करावा. वेळप्रसंगी‎ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे‎ आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने‎ करण्यात आले आहे.‎

लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद‎ असलेल्या पार्क केलेल्या वाहनात‎ ठेऊ नये. दुपारी १२ ते ३:३० या‎ कालावधीत उन्हात बाहेर जाणे‎ टाळावे. गडद व जाड कपडे‎ घालण्याचे टाळावे. बाहेरील तापमान‎ अधिक असल्यास शारीरीक श्रमाची‎ कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत‎ स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच‎ मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची‎ दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात‎ यावी, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने‎ कळवण्यात आले आहे.‎