आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशीही ‘हॅटट्रिक’:सलग तिसऱ्या दिवशी‎ विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक, पारा 45.5 अंशांवर

प्रतिनिधी | अकोला‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भात अकोल्यात सलग तिसऱ्या‎ दिवशी सर्वाधिक ४५.५. अंश सेल्सिअस तापमान‎ नोंदवण्यात आले. या आठवड्यात ३ मे रोजीही‎ अकोला विदर्भात सर्वात जास्त तापले होते.‎ विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची‎ शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना‎ उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला‎ आहे. रोज वाढते तापमान पाहता कमाल तापमानामध्ये‎ येणाऱ्या काही तासात सर्व उच्चांकी नोंद होणार आहे.‎ दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत जाणार आहे.‎ येणाऱ्या मान्सून पर्यंत तापमान हळूहळू वाढतच‎ असणार आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ४० पेक्षा जास्त‎ डिग्रीपर्यंत तापमान जात आहे.‎

यामुळे तापमानात वाढ‎

एप्रिल महिन्यात पावसाने हजेरी‎ लावल्यानंतर आता मे‎ महिन्याच्या पहिल्या‎ दिवसापासूनच जिल्ह्यात उन्हाचे‎ चटके राेज जादा जाणवत‎ आहेत. बंगालच्या उपसागरात‎ होणारे बदल होत असल्याने‎ अचानक तापमानात एवढे वाढत‎ आहे. गत काही दिवसांपासून‎ बंगालच्या उपसागरात मोचा‎ वादळ सक्रिय झाले आहे.‎ त्यामुळे तापमानात मोठी वाढ‎ झाली आहे.‎

विदर्भाचा चढता पारा‎

शहर कमाल‎ अकोला ४५.५‎ अमरावती ४५.४‎ बुलढाणा ४०.८‎ ब्रम्हपुरी ४२.०‎ चंद्रपूर ४२.२‎ गडचिराेली ४१.८‎ गाेंदिया ४२.५‎ नागपूर ४४.३‎ वर्धा ४४.९‎ वाशीम ४०.०‎ यवतमाळ ४३.५‎