आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अकोट-अंजनगाव मार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या 4 जणांना टेम्पोने उडवले. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर एक जखमी झाला आहे. या धडकेनंतर टेम्पोही उलटला. उत्तमराव नाठे, शालिकराम राऊत, गजानन नेमाडे (सर्वा रा,रामटेकपुरा, अकोट) यांचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला. पोलिसांनी टेम्पो चालक आणि वाहन पकडले आहे.
अकोट शहरातील नागिरक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. दरम्यान एक टेम्पो (एम एच 20 डीइ 7433) चालकाने निष्काळजीपणे, भरधाव वेगाने चौघांना धडत देत चिरडले. यात तिघांचा जागीत मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. सध्या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.