आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉझिटिव्ह रुग्ण:एकाच दिवशी दहा अहवाल पॉझिटिव्ह; जिल्ह्यात सात,अन्य जिल्ह्याचे तीन रुग्ण

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात ८ जूनपासून सलग कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. शनिवारी, ११ जूनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून प्राप्त आरटीपीसीआर चाचण्यांच्या अहवालात एकाच दिवशी दहा रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यात सात रुग्ण हे जिल्ह्यातील तर तीन रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील रुग्ण विविध भागातील रहिवासी असून, सद्यःस्थितीतील सक्रीय रुग्णांपैकी सर्वोपचार रुग्णालयात चार रुग्ण दाखल आहेत. यापैकी एक रुग्ण अतिदक्षता विभागात तर उर्वरित रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली .चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रारंभी एक ते दोन या संख्येने रुग्ण वाढत असतानाच शनिवारी एकाच दिवशी सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तिसऱ्या लाटेचा कोविड संसर्ग काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आला होता. मात्र पंधरा दिवसांपासून पुन्हा रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली आहे. २३ मे रोजी अकोला शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा त्यांच्या कुटुंबात एक रुग्ण आढळला. ८ जूनला २, ९ व १० जूनला प्रत्येकी एक, ११ जूनला ७ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ११ झाली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोविड संदर्भात लक्षणे आढळत असल्यास दुर्लक्ष न करात वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन चाचणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...