आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमुक्ती योजना:दहा हजार 150 शेतकरी ठरले कर्जमुक्ती योजनेसाठी अपात्र

अकोला7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणी आयकरदाते तर कोणी शासकीय आणि नमिशासकीय सेवेत

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअतंर्गत आतापर्यंत १० हजार १५० शेतकरी अपात्र ठरले आहेत. अपात्रेच्या कारणांमध्ये आयकरदाते असणे, शासकीय-नमिशासकीय सेवेत कार्यरत असणे आदींचा समावेश आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदानाचा देण्याची घोण राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्यानंतर आता कर्जमुक्ती योजनेची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.

यापूर्वीच्या भाजपच्या नेतृत्वातील राज्य सरकारने छत्रपती शविाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र यात निकष व अटींचा भरणा असल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता. दरम्यान २०१९मध्ये राज्यात सत्ता परविर्तन झाले आणि महाविकास आघाडीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेची अंमलबजावणी सन २०१९मध्ये सुरू झाली. या योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमधे कर्जमाफी देण्याचे शासनाने जाहीर केले होते. तीन टप्प्यात कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले होते

कर्जमुक्ती योजनेचा यांना मिळणार नाही लाभ
कर्जमुक्ती योजनेचा लाभ खालील व्यक्तींना मिळणार नाही, हे शासन िनिर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते.
>आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार
केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून).
>केंद्र, राज्य शासनाचे सर्व अधिकारी-कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन २५ हजारांपेक्षा जास्त असणारे (चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
>राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी. (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
>सहकारी साखर कारखाने,कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दुध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी.
>२५ हजार रुपयांपेक्षा पेक्षा जास्त नविृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती
>शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती.

तालुकानिहाय अपात्र लाभार्थी संख्या अशी
तालुका अपात्र लाभार्थी

अकोला १९१४
अकोट १३७०
तेल्हारा १६०७
पातूर १०८९
बार्शीटाकळी ०९१२
बाळापूर १२४१
मूर्तजिापूर २०१७
एकूण १०१५०

बातम्या आणखी आहेत...