आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला अटक केल्याने आईची आत्महत्या:लेकराचे कसे होईल, या चिंतेने घेतला गळफास; न्यायालयाच्या आदेशाने अकोल्यात गुन्हा दाखल

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाला अटक केल्यामुळे मुलाच्या आईने आत्महत्या केल्याचा प्रकार अकोल्यात घडला आहे. या आत्महत्येला मुलाला अडकवणारे जबाबदार आहेत, अशी तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अखेर न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी दोघांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण

एफआयआर नुसार, 1 एप्रिल 2020 रोजी उगवा येथील अरुण सोपान राजगुरे यांच्या मुलाला अकोट फैल पोलिसांनी पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. 3 एप्रिल रोजी उमेश श्रीनाथ व त्याची पत्नी मंगला श्रीनाथ असे दोघे सोपान राजगुरे यांच्या घरी गेले. त्यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर 7 एप्रिल रोजी मुलाच्या जामीन अर्जावर सुनावणी असता कोर्टाच्या बाहेर उमेश आणि त्याची पत्नी मंगला भेटले. तक्रार परत घेण्यासाठी त्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. अन्यथा मुलाचा जामीन होऊ देत नाही असे म्हटले.

मुलाच्या चिंतेने केली आत्महत्या

दरम्यान, उगवा येथे मंगलाने एक लाख रुपयात तडजोड होऊ शकते असे म्हटले, त्यानंतर अरुण राजगुरु यांच्या पत्नीला उमेशने तुझ्या मुलाचा जामीन कसा होतो तेच पाहतो, असे म्हटले. तेव्हापासून अरुण राजगुरु यांच्या पत्नी टेन्शनमध्ये आल्या. आपल्या मुलाचे कसे होईल, असे त्या वारंवार म्हणत होत्या. अखेर दोघेही झोपल्यानंतर रात्रीच्या सुमारास अरुण राजगुरू यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर अकोटफैल पोलिस ठाण्यात अरूण राजगुरू यांनी धाव घेत तक्रार दिली. पत्नीच्या मृत्यूला उमेश श्रीनाथ व मंगला श्रीनाथ जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अखेर पोलिसांनी गुरुवारी आरोपी उमेश श्रीनाथ व मंगला श्रीनाथ यांच्याविरुद्ध भांदविचे कलम 294, 306, 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...