आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव:सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टमुळे बाळापुरात तणाव ; पोस्ट टाकणाऱ्याला ताब्यात घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाज माध्यमावर जातीय तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट टाकल्याच्या कारणावरून शहरात गुरुवारी ९ जूनला तणाव निर्माण झाला होता. काहींनी बाजारपेठ बंद करून या घटनेचा निषेध नोंदवला. या प्रकरणी पोलिसांनी परिस्थिती हाताळत पोस्ट टाकणाऱ्या युवकाला ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सोशल मीडियावर बुधवारी ८ जूनला एका समाजाच्या धर्मगुरुंबाबत वादग्रस्त पोस्ट आल्याने शहरात गुरुवारी दुपारी एका समाजाच्या लोकांनी गर्दी केली. त्यानंतर हा जमाव पोलिस ठाण्यात आला. ही माहिती परिसरात पसरली. काही लोकांनी बाजारपेठही बंद केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जादा पोलिस कुमक बोलावली. अकोला येथून पोलिस अधिकारी व कर्मचारी हे शहरात आले. पोलिसांनी व आरसीपीच्या पथकाने वेळीच या गर्दीवर नियंत्रण करीत परिस्थिती आटोक्यात आणली. गुरुवारी दुपारी बाजारपेठ बंद केली होती. सोबतच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास नागरिकांना मज्जाव केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पोस्ट टाकणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले. अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तसेच जादा कुमकही बोलावली होती. दरम्यान, शहरातील शांतता समिती सदस्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास हा तणाव निवळला. केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पोस्ट टाकणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले. अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तसेच जादा कुमकही बोलावली होती. दरम्यान, शहरातील शांतता समिती सदस्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास हा तणाव निवळला.

बातम्या आणखी आहेत...