आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानळ पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या “स्वच्छ जल से सुरक्षा या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ५१८ पाणी स्त्राेतांची चाचणी हाेणार आहे. यासाठी पाण्याचे नुमने घेण्यास प्रारंभ झाला आहे. या अभियानाची केंद्र शासनाच्यावतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे.अभियानात जिल्ह्यात अस्तित्वातल नळ पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासह पिण्याच्या पाण्याची स्त्रोतांचे रासासायनिक, जैविक परीक्षण तसेच एफटीके किटद्वारे महिलांच्या सहभागाने पाणी गुणवत्ता तपासणी महिनाभराच्या अभियान काळात केली जात आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यात अस्तित्वातील सर्व नळ पाणीपुरवठा योजना व रेट्रोफिटिंग करण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रमुख स्त्रोतांचे “हर घर जल” या मोबाइल ॲपद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. नवीन योजनांच्या स्त्रोतांचे काम पूर्ण झाले असल्यास अथवा स्त्रोत अस्तित्वात असल्यास त्याचेही जीओ टॅगिंग करण्यात येणार आहे.
येथे हाेणार तपासणी स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रत्येक नळ पाणी पुरवठा योजनांच्या स्त्रोतांची मान्सून पश्चात कालावधीतील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येत आहे. जलसुरक्षकांच्या सहाय्याने पाणी नमुने गोळा करून जिल्हा अथवा उपविभागीय प्रयोगशाळेत पोहचविले जात आहेत. जिल्हा अथवा उपविभागीय प्रयोगशाळेत प्राप्त झालेले सर्व पाणी नमुने तपासणी करून वाॅटर क्वाॅलिटी एमआयएस व हर घर जल अॅपवर तपासणी अहवाल सादर करण्यात येईल.
उपाय याेजना हाेणार महिलांच्या मदतीने एफटीके किटद्वारे पाणी नमुण्यांची रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येईल. यासाठी प्रत्येक गावात पाच महिलांची निवड करून त्यांना एफटीकेबाबत त्यांना प्रशिक्षित केले जात आहे. पाणी नमुने तपासणीच्या नोंदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंदवले जाणार आहे. किट तसेच प्रयोगशाळेमधील पाणी नमुने तपासणीमध्ये दूषित आढळून आलेल्या स्त्रोतांवर उपचारात्मक उपाय योजना केल्या जातील, अशी माहिती कळवण्यात आली आहे.
अभियानात हे आहेत सहभागी
३१ िडसेंबर राबवण्यात येणाऱ्या या अभियानादरम्यान नळ योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोतांचे जीओ टॅगिंग करणार आहे. पाणी तपासणी करून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता निश्चित केली जाणार आहे. जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नाेंदवत आहेत. यात यात आरोग्य सेवक, गाव स्तरावरील पाच महिला यांच्या मदतीने पाणी नमुने गोळा हाेत आहेत. आरोग्य सेवक, जलसूरक्षक हे पाणी स्त्रोतांचे जिआे टॅगिंग करीत आहेत.
प्रकल्प साठवण क्षमता ८.२५ द.ल.घ.मी.
या प्रकल्पाची साठवण क्षमता ८.२५ द.ल.घ.मी.आहे. या प्रकल्पातून काटीतील २३७ हेक्टर, पाटीतील २१७ हेक्टर, किनखेडमधील १२२ हेक्टर, केळीवेळीतील ८५४ हेक्टर, रोहणातील १९७ हेक्टर,वडद येथील १७३ हेक्टर अशी १८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. मात्र प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने जमीन सिंचनापासून वंचित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.