आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎‎:‘आरपीएफ’च्या ठाणेदाराला एक‎ लाखाची लाच घेताना अटक‎

अकोला‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला येथील दक्षिण रेल्वेच्या रेल्वे‎ सुरक्षा बलाच्या ठाणेदाराला एक लाख‎ रुपयांची लाच घेताना ‘सीबीआय’ने‎ अटक केली. यासोबतच एका खासगी‎ व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.‎ दोघांनाही अमरावती येथील सीबीआय‎ कोर्टात शनिवारी हजर केले असता‎ न्यायालयाने मंगळवार १४ मार्चपर्यंत‎ सीबीआय कोठडी सुनावली आहे.‎ मुकेशकुमार मिणा असे लाचखोर‎ ठाणेदाराचे नाव आहे.

तर त्याला मदत‎ करणाऱ्या खासगी व्यक्तीचे नाव सुरेश‎ चंदन आहे. तक्रारदाराच्या वडिलाविरूद्ध‎ आरपीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला‎ होता. त्या गुन्ह्यामध्ये अटक न करता‎ जामीनावर सोडण्यासाठीचा अभिप्राय‎ न्यायालयात देण्याच्या बदल्यात ठाणेदार‎ मुकेशकुमार मिणा याने तीन लाख‎ रूपयांची मागणी केली होती. त्यानंतर‎ तक्रारदाराने नागपूर ‘ सीबीआय’कडे‎ तक्रार केली.‎ ‘सीबीआय’ने शनिवारी सापळा रचून‎ मुकेशकुमार याला एक लाख रूपयांची‎ लाच घेताना अटक केली. तर खासगी‎ व्यक्ती सुरेश चंदन यालाही अटक करून‎ या दोघांसह मध्यस्थी करणारा सय्यद‎ मुजमीर अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल‎ केला आहे. ‘ सीबीआय’चे अधिकारी या‎ प्रकरणी तपास करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...