आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरातून दागिने चोरून नेणाऱ्या आरोपीला खदान पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पकडले. या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख ८ हजार ३६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी केली. मितेश अमर गिरी (वय १९ रा. गवळी मंगल कार्यालयासमोर मलकापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खडकी येथील कोठारी वाटिकेतील रहिवासी शितल प्रल्हाद पाखरे या ३० मार्च रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गणपती मंदिरात देवदर्शनासाठी कुटुंबासह गेल्या होत्या. त्या रात्री ११ वाजता परत आल्यानंतर त्यांच्या घरातून ६३ हजार ९०० रूपयांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले.
या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून ४ एप्रिल २०२३ रोजी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ठाणेदार श्रीरंग सनस यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी डीबी पथकातील कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी संशयावरून आरोपी मितेश अमर गिरी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने व दुचाकी जप्त केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीरंग सनस, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र धुळे व पोलिस अंमलदार विजय चव्हाण, डिंगबर अखरराव, नितीन मगर, रविराज डाबेराव, संदीप ताले यांनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.