आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ बडनेरा प्रवास करणाऱ्या एका प्रवासाचा मोबाइल व साडेचार हजार रुपये रेल्वेस्थानकावरून गुरुवारी सकाळी १० वाजता चोरट्याने चोरले होते. रेल्वे पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध सुरू केला असता अकोला बस स्थानकावरून त्याला पकडले. आरोपीकडून पोलिसांनी चोरीचा मोबाइल जप्त केला आहे. गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गणेश लखनसिंग ठाकूर, रा. वाशीम हे भुसावळ- बडनेरा पॅसेंजरने अकोला रेल्वे स्टेशन येथे उतरत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या खिशातील १९ हजार रूपयांचा मोबाइल व ४ हजार ५०० रूपये रोख रक्कम असलेली मनी पर्स असे चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी गुन्हयातील आरोपीचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेण्याकरीता सहायक फौजदार सतिशसिंग चव्हाण, पोलिस नाईक संजय वडगीरे, उल्हास जाधव, अमोर अवचार यांचे तपास पथक तयार केले. सायबर सेल, लोहमार्ग नागपूर येथून फिर्यादी यांच्या मोबाइलच्या टॉवर लोकेशनची माहिती घेतली असता हा मोबाइल अकोला एसटी स्टँड येथे असल्याचे दिसले व त्यानंतर आरोपीने हा मोबाइल फोन बंद केला. त्यामुळे तपास पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेवून आरोपीचा शोध घेवून आरोपी गजानन सुखदेव साळोकार, वय ३० वर्षे, रा.घाटपुरी नाका, चोपडेचा मळा, खामगाव यास ताब्यात घेवून तयाच्याकडून चोरीस मोबाइल जप्त केला. आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून,या आरोपींना गुन्हयाच्या तपासकामी अटक करण्यात आलेली आहे. गुन्हा दाखल होताच दखल घेत आरोपीचा शोध घेवून गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.