आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन मुलीला पळवून घेऊन जाणाऱ्या युवकाला लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. मात्र आरोपी नंतर पोलिस ठाण्याच्या आवारातून पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळून गेला. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांत गुन्हा नोंदवला.
१४ डिसेंबरला दुपारी अडीच वाजता म्हैसपूर येथील एका १७ वर्षीय मुलीला शेख शहबाज शेख हमीद वय २३ रा. हाता लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने गाडीवर बसवून पळवून घेऊन जात होता. त्याला म्हैसपूर येथील लोकांनीच पकडले आणि बार्शीटाकळी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी शेख शहबाज शेख हमीदला पोहेकॉ. सुभाष मुर्तडकर हे पोलिस वाहनातून ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे घेऊन गेले व वैद्यकीय तपासणी करून त्यास पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्याला वाहनातून उतरवत असताना रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी अंधाराचा फायदा घेत आरोपी पोलिसाच्या हाताला झटका मारून पळून गेला. त्याचा पाठलाग केला असता तो पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम २२४ नुसार गुन्हा दाखल केला
अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन जाणाऱ्या युवकाला लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. मात्र आरोपी नंतर पोलिस ठाण्याच्या आवारातून पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळून गेला. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांत गुन्हा नोंदवला.
१४ डिसेंबरला दुपारी अडीच वाजता म्हैसपूर येथील एका १७ वर्षीय मुलीला शेख शहबाज शेख हमीद वय २३ रा. हाता लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने गाडीवर बसवून पळवून घेऊन जात होता. त्याला म्हैसपूर येथील लोकांनीच पकडले आणि बार्शीटाकळी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी शेख शहबाज शेख हमीदला पोहेकॉ. सुभाष मुर्तडकर हे पोलिस वाहनातून ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे घेऊन गेले व वैद्यकीय तपासणी करून त्यास पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्याला वाहनातून उतरवत असताना रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी अंधाराचा फायदा घेत आरोपी पोलिसाच्या हाताला झटका मारून पळून गेला. त्याचा पाठलाग केला असता तो पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम २२४ नुसार गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.