आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सिसोदियांवरील कारवाई निंदनीय : आ. रोहित पवार

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली सरकारच्या मद्य धोरणासंदर्भात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयने कारवाई केली आहे. या कारवाईचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निषेध केला. ते म्हणाले, मी यापूर्वी मनीष सिसोदिया यांना भेटलो आहे. दिल्ली शहरात शिक्षण व आरोग्य क्षेत्रात चांगले काम झाले आहे. त्यामुळे कुठला तरी मुद्दा काढून नेत्यांना अटकाव करण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. अशा राजकारणाचा सर्वांनी विरोध करणे आवश्यक असल्याचे आ. रोहित पवार म्हणाले.

मूर्तिजापूर येथे दहीहंडीच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार रविवारी आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान रोहित पवार यांनी मूर्तिजापूरच्या रस्त्यांवर बुलेटस्वारीचा आनंद घेतला. त्यांनी मूर्तिजापुरात पोहाेचल्यावर कारमधून उतरून थेट कार्यकर्त्यांची बुलेट गाडी हाती घेतली. तसेच बुलेटवर येत कार्यक्रमस्थळी पोहाेचले. या वेळी शहरात त्यांचे ठिक-ठिकाणी स्वागत झाले. कार्यक्रमप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार नीलेश लंके, आ. अमोल मिटकरी देखील उपस्थित होते.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने चुळबूळ राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारमध्ये भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना मंत्रिपदे मिळालेली नाहीत. याची खदखद त्यांच्यामध्ये आहे. बच्चू कडू यांनाही शिंदे यांचे विचार पटले. ते सुरुवातीपासून त्यांच्यासोबत होते. पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. हा एकप्रकारे त्यांच्यावर अन्याय आहे. यावर त्यांनी विचार करण्याची गरज आहे. पुढे त्यांना संधी मिळेलही, पण सुरुवातीपासून सोबत गेलेल्या सध्या तरी डावलण्यात आल्याचे चित्र आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यात मागे राहिलेल्यांमध्ये सध्या प्रचंड चुळबूळ असल्याची माहिती आहे, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...