आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:जुना धान्य बाजारातील दुकानांवरील कारवाई दहा जानेवारीपर्यंत टळली

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मध्यवर्ती भागातील जुना धान्य बाजारातील जागेवर अतिक्रमण केलेल्या ८७ दुकानांवरील २ जानेवारीला होणारी कारवाई शासनाच्या पत्रामुळे लांबणीवर पडली आहे. यामुळे या भागातील व्यावसायीकांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. नझुल शीट क्रमांक ३९ बी, भुखंड क्रमांक १२, ५४/१ आठ हजार ९११ चौरस फूट जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे.

ही जागा महसूल विभागाच्या मालकीची आहे. ही जागा १९८० मध्ये लघु व्यावसायिकांना दैनंदिन शुल्क आकारण्याच्या पद्धतीने देण्यात आली होती. या जागेवर कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र २० रुपये रोज यानुसार भाड्याने घेतलेल्या या जागेवर अनेकांनी पक्के बांधकाम केले. या अनुषंगाने महापालिकेच्या पथकाने ४ नोव्हेंबरला कारवाई सुरु केली होती. व्यावसायिकांनी साहित्य काढण्यास वेळ मागीतला. प्रशासनाने आठ दिवसाचा कालावधी दिला. त्यानंतर पथकाने कारवाईसाठी २८ नोव्हेंबरचा दिवस निवडला.

मात्र दहा दुकाने पाडल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली होती. दरम्यान प्रशासनाने या व्यावसायिकांना सात दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपुष्टात आल्याने २ जानेवारी २०२३ रोजी धडक कारवाई केली जाणार होती. महापालिका अतिक्रमण पथकाने तशी तयारी देखिल केली. मात्र १ जानेवारीला रविवारी सायंकाळी उशिराने महापालिकेला पत्र मिळाले.

बातम्या आणखी आहेत...